✏️ अनुक्रमणिका
१८. केसांसाठी विविध तेले
प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
उन, पाणी, हवा, धूळ या गोष्टी आपल्या केसांना कोरडे, निस्तेज व कमकुवत बनवतात. परिणामी केस गळती, केस सफेद होणे यांसारखे मनस्ताप देणारे त्रास सुरू होतात.
➤ प्रखर उन्हात बाहेर पडताना केसांना नेहमी रुमाल गुंडाळावा. कारण कडक उन्हाने केसांचा मूळ रंग फिका पडून केस कोरडे होतात.
➤ केस लांब असल्यास आंबाडा बांधावा किंवा वेणी तरी घालावी. केस मोकळे ठेवल्याने केसांत गुंता होऊन विंचरताना केस तुटतात.
➤ समुद्राच्या आसपास फिरावयास जाताना केसांना न विसरता रुमाल गुंडाळावा. कारण त्या खाऱ्या वातावरणातील क्षारांचा केसावर घातक परिणाम होतो.
➤ पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडताना केसांभोवती इलॅस्टिक असलेली काळ्यारंगाची (पावसाळ्यात सहज मिळतात) प्लॅस्टिकची घट्ट कॅप (टोपी) वापरल्याने केस भिजत नाहीत. त्यामुळे सतत केस ओलसर राहिल्याने उद्भवणारे त्रास टाळता येतात.
➤ केसांच्या मुळांशी कापसाच्या बोळ्याने थोडे "यु. डी. कोलन" लावावे. त्यामुळे केस बराचकाळ पर्यंत आपण विंचरल्याप्रमाणेच राहतात. यु. डी. कोलन लावल्याने घामाने चिकटा बसून केस एकमेकांना चिकटण्याची भीती नसते.
➤ बाहेर पडण्यापूर्वी केसांना शक्यतो तेल लावू नये.
➤ बाहेर पडण्यापूर्वी वा प्रवासातून आल्यावर केसावरून नहाण केल्यावर (यासाठी केस धुण्यासाठी सुचित केलेल्या पैकी एखादा औषधी संच वापरावा) खोबरेल तेलात अंडे खलून त्याचा कंडीशनर म्हणून वापर करावा. नंतर अर्ध्या तासाने परत केस धुवावेत.
➤ प्रवासातून आल्यावर दहीमिश्रीत मेंदीचा हेअर पॅक लावल्याने केस मुलायम होण्यास मदत होते.