✏️ अनुक्रमणिका
१६. काळी मेंदी
१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१८. केसांसाठी विविध तेले
काळी मेंदी
काळी मेंदी या नावाने जे हर्बल उत्पादन मिळते त्याचा मेंदीशी नावाशिवाय काहीही संबंध नसतो. यात असते फक्त शिसे व रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेले इतर रंगांचे मिश्रण. अर्थातच या रासायनिक वस्तुंचा शरीरावर व त्वचेवर अनिष्ट परिणाम होतो. हे परिणाम टाळण्यासाठी काळ्या मेंदीचा वापर अजिबात टाळावा. त्यातून कोणी ही काळी मेंदी वापरलीच आणि काही अनिष्ट परिणाम जाणवलेच तर :
➤ कोरफडीचा ताजा गर दिवसातून २ वेळा केसांना व त्याखालील त्वचेला हळुवारपणे चोळून लावावा. १० मिनिटांनंतर केस थंड पाण्याने धुवावेत.
➤ केसांसाठी वापरावयाच्या प्रत्येक संचात कोरफडीचा गर वापरावा.
➤ रासायनिक हेअर डाय वापरणारांनी त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दर १०/१५ दिवसांनी एकदा तरी मेंदीचा हेअर पॅक करावा.
➤ केसांना हेअरडाय लावल्यानंतर वनौषधीयुक्त हेअरकंडीशनर लावावे. त्यामुळे हेअरडायचे दुष्परिणाम टाळले जाऊन केस मुलायम व चमकदार होतात.
➤ १५ दिवसांतून एकदा पांढऱ्या केसावरील प्रतिबंधक वनौषधी संचाचा केसांना लावण्यासाठी वापर करावा.
➤ आठवड्यातून एकदा कोंड्यावरील प्रतिबंधात्मक अशा एखाद्या औषधी संचाचा केसांना लावण्यासाठी वापर करावा.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.
🙏💐 धन्यवाद 💐🙏