✏️ अनुक्रमणिका
३. केसांची सामान्य चिकित्सा 🎯
४. केस गळती
५. केसांची वाढ होण्यासाठी
६. टक्कल
७. केेेस पिकणे
८. केसांचे नहाण
९. केसातील उवा लिखा
१०. केसातील कोंडा
११. खवडा
१२. केसात चाई
१३. केसांची अनावश्यक वाढ
१४. काळी मेंदी
१५. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१६. केसांसाठी विविध तेले
केसांची सामान्य चिकित्सा
केसांच्या सामान्य तक्रारीसाठी खालील उपचार करावेत.
➤ केसांच्या संवर्धनासाठी खालीलपैकी एका तेलाचा आठवड्यातून दोन वेळा रात्री केसांना लावण्यासाठी वापर करावा.
१) महाभृंगराज तेल
२) पदमिनी आयुर्वेदिक हेअर केअर ऑईल
३) पित्तपापडा तेल
४) ब्राम्ही तेल
५) निलभृंगादि तेल
➤ त्रिफळा चूर्ण, अश्वगंधा पावडर, शतावरी चूर्ण यांचे समभाग मिश्रण करून दिवसातून २ वेळा १/१ चमचा मिश्रण पाण्याबरोबर घ्यावे.
➤ केसांच्या चांगल्या वाढीसाठी सागाच्या बियांची पावडर गरम पाण्यात कालवून मिश्रण केस धुण्यासाठी वापरावे.
➤ आंघोळीच्या पाण्यात अर्धा पेला शिरका टाकून त्या पाण्याने नहाण करावे.
➤ केसांना चमक येण्यासाठी माका पावडर, त्रिफळा चूर्ण, मेंदी पावडर, *संत्र्याच्या सालीची पावडर समभाग घेऊन कोरफडीच्या ताज्या गरात कालवून केसांना हेअर पॅक करावा. अर्ध्या तासानंतर नहाण करावे.
➤ रात्री केसांना तेल लावण्यापूर्वी अर्धा तास केसांच्या मुळांशी, गाळून घेतलेला लिंबाचा ताजा रस बोटांनी चोळावा.
टिप : *संत्र्याच्या सालीतील सफेद तंतू काढून साल सावलीत सुकवून मिक्सरमध्ये वाटून वस्त्रगाळ पावडर करून घ्यावी.
➤ केसांना लावण्यासाठी जपाकुसुमादि तेलाची कृती प्रकार १ :
जास्वंदीची फुले, ब्राम्हीचा पाला किसलेला आवळा, माका, बावची कुटलेली, निमपत्र (कडुनिंबाची सुकी पाने), कचरसुगंधी ही समभाग औषधे खोबरेल तेलात किंवा तिळाच्या तेलात घालून, उकळून तेल सिध्द करून, गाळून (वस्त्रगाळ करून) केसांना लावण्यासाठी वापरावे.
➤ लिंबाच्या रसात अंड्यातील बलक फेसून त्याने हेअर पॅक करावा. अर्ध्या तासानंतर केस शिकेकाई पावडरने किंवा रिठ्याच्या पाण्याने धुवावेत.
➤ केस धुण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.
➤ माका पावडर, आवळाचूर्ण, शतावरी चूर्ण, जेष्ठमध पावडर प्रत्येकी १०० ग्रॅम व पांढऱ्या तिळाचे कूट ३०० ग्रॅम एकत्र करून रोज सकाळ-संध्याकाळ १/१ चमचा प्रमाणात घ्यावे.
➤ प्रत्येकी १० ग्रॅम जटामासी, मेंदी, शिकेकाई, नागरमोथा, चंदन पावडर व २५ ग्रॅम त्रिफळा चूर्ण एकत्र करून ठेवावे. यातील १ ते २ चमचे चूर्ण १ कप चहाच्या पाण्यात कालवून हेअरपॅक करावा.
➤ नस्य चिकित्सा (शिरसोव्दार चिकित्सा) करावी. पचेंद्रियवर्धन तेल किंवा अणू तेल किंचित गरम करून त्याचे २/२ थेंब दोन्ही नाक पुड्यांत आलटूनपालटून घालावे. (एकाच वेळी दोन्ही नाकपुड्यांत थेंब टाकू नयेत.)
➤ केसांच्या वाढीसाठी केसांना माक्याचे तेल लावावे.
➤ केसांना बळकटी प्राप्त होण्यासाठी *"वटजटादि तेल" लावावे.
➤ केसाच्या मुळाकडील उष्णता कमी होण्यासाठी केसांना *"अमलक्यादि तेल" लावावे.
टिप : *वडाच्या पारंब्यांचे कोवळे बोख वापरून तयार केलेले तेल. | *आवळ्याचे तेल
➤ केसांना लावण्यासाठी लिंबू व खोबरेल तेल या मिश्रणाचा वापर करावा.
➤ केसासाठी शक्यतो कोणत्याही बाजारी कलपाचा उपयोग करू नये.
केसांच्या मुळाकडील (डोक्यावरील त्वचेतील) उष्णता कमी होण्यासाठी -
➤ आठवड्यातून २ वेळा "जपाकुसुमादि तेलाने" (जास्वंदीच्या तेलाने) हलका मसाज करावा.
➤ १/१ चमचा "रसायन चूर्ण" (गुळवेल, गोखरू व आवळकाठी यांच्या पावडरीचे समभाग मिश्रण) सांज-सकाळ पाण्याबरोबर घ्यावे.
➤ ३/३ गोळ्या आरोग्यवर्धिनी व ब्राम्हीवटी एकत्र बारीक करून सांज-सकाळ पाण्याबरोबर घ्याव्यात.
➤ साधारणपणे केसांचा पोत, निर्मिती ही अनुवंशिक असते. पण आहारात मोड आलेले मूग, हरभरे, अंडी, कलेजी पालक यांचा विशेष वापर केल्यास शरीराला भरपूर लोहतत्त्वे प्राप्त होतात. तसेच प्रोटिन्सचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी मांस मच्छी, पनीर, दूध, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात आहारात घ्याव्यात. यामुळे केसांचे सौंदर्य वाढते व टिकून राहते.
➤ ५० मिली खोबरेल तेलात १० मिली जोजोबा तेल, १० थेंब चंदन तेल, १० थेंब लव्हेंडर तेल, १० थेंब जिरॅनियम तेल घालून मिश्रण चांगले हलवून रात्री केसांचे मुळाशी चोळून लावावे. सकाळी नहाण करावे.
➤ ५० मिली तिळाचे तेलात १ मिली गव्हांकूर तेल, २० थेंब रोझमेरी तेल, २० थेंब लव्हेंडर तेल, २० थेंब जिरॅनियम तेल घालून मिश्रण केसांना रात्री लावावे व सकाळी नहाण करावे.
➤ केसांच्या मुळांना काही इजा पोहोचली असल्यास "जास्वंदजेल" या औषधीचा उपयोग करावा.
केसांचे सौंदर्य व आरोग्य चांगले राहण्यासाठी पोटात घेण्याच्या उपचारांबरोबर बाह्योपचार जेवढे आवश्यक आहेत तेवढाच केसांना व्यायाम देणे आवश्यक आहे.
➤ योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, शीर्षासन, शवासन, मानेचे व्यायाम योग्य जाणकाराकडून शिकून घेऊन घरच्याघरी योग्य रितीने व्यायाम घ्यावा. (प्रत्यक्ष जिममध्ये जाऊन फारसा उपयोग होत नाही.)
➤ पोहोण्याचा व्यायाम शरीरासाठी उपयुक्त असला तरी केसांसाठी नुकसानकारकच ठरतो.
➤ दोन्ही हाताच्या बोटांच्या टोकांनी डोक्यावरील त्वचेवर गोलगोल फिरवित दाब द्यावा.
केसांवर हळुवारपणे पण वरचेवर (फक्त व्यायामाच्या वेळेतच) ब्रश फिरवावा.
➤ हाताच्या तळव्याने गोलाकार मसाज करावा.
केसांच्या थोड्या थोड्या बटा हातात धरून त्यांना ताण द्यावा.
➤ अॅक्युप्रेशर (AccuPressure) पध्दतीने कानामागे, मानेवर, कपाळावर व नखावर दाब द्यावा. व्यायामामुळे सुरवातील केस गळती फार होते पण तेथील त्वचेचे रक्ताभिसरण चांगले होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
➤ कोरफडीचा ताजा गर, अंड्यातील बलक व मेंदी पावडर (काळी मेंदी नव्हे) एकत्र करून केसांना हेअर पॅक करावा. हा पॅक पूर्ण सुकण्यापूर्वी केस रिठ्याच्या पाण्याने धुवावेत. कोरडे केस असणाऱ्यांसाठी हा हेअरपॅक उत्तम.
➤ कडुनिंबाच्या पानांची पावडर, तुळशीच्या पानांची पावडर, बावची पूड, संत्र्याच्या सुक्या सालींची पावडर व कचूरसुगंधी यांचे मिश्रण शाम्पू म्हणून वापरावे. यामुळे केसांना एक प्रकारचा तजेला येऊ शकतो.
➤ मेथी रात्रभर पाण्यात भिजत घालावी. सकाळी त्याच पाण्यात वाटून त्याचा हेअर पॅक करावा. हा हेअर पॅक संपूर्ण सुकण्यापूर्वी केस शिकेकाई पावडरने धुवावेत.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.
🙏💐 धन्यवाद 💐🙏