✏️ अनुक्रमणिका
६. केसांची वाढ होण्यासाठी
७. टक्कल
८. केेेस पिकणे
९. केसांसाठी कलप
१०. केसांचे नहाण
११. केसातील उवा लिखा
१२. केसातील कोंडा
१३. खवडा
१४. केसात चाई
१५. केसांची अनावश्यक वाढ
१६. काळी मेंदी
१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१८. केसांसाठी विविध तेले
केस पिकणे
काळ्याभोर वा पिंगट केशसंभाराचा मोह प्रत्येक व्यक्तीला असतो. पण याच केशसंभारात एखादा पांढरा केस डोकावू लागला कि मनाला चिंता पोखरू लागते. निरोगी, काळे वा पिंगट केस हे सौंदर्याचे एक लक्षण मानले जात असल्याने केस पांढरे व्हावयास सुरवात होताच हा उपचार कर, तो उपचार कर अशी एकच धावपळ सुरू होते आणि या धावपळीमुळे किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपण अधिकच संकटात पडतो.
केस पिकण्याची कारणे :
➤ सतत कसली ना कसली चिंता करत राहणे.
➤ आनुवंशिकता.
➤ काही कारणाने रक्ताभिसरण मंदावल्यास.
➤ असमतोल आहार.
➤ आहारात मिठाचे प्रमाण जास्त असणे.
➤ वारंवार सर्दीचा त्रास होणे किंवा सायनसचा विकार असणे.
➤ आहारात नेहमी लोणची, पापड, आंबट, खारट, तेलकट पदार्थाचे प्रमाण जास्त असणे.
➤ तीव्र स्वरूपाचा मानसिक धक्का बसणे.
मुळातच पित्त प्रकृती असणे.
केस पांढरे न होण्यावर उपचार :
एकदा केस पांढरे झाले की पुन्हा ते काळे होणे जवळजवळ अशक्य असते. एखादा पांढरा केस दृष्टीस पडताच केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबावी म्हणून तातडीने उपाय करणे आवश्यक असते.
➤ आहारात योग्य तो बदल करावा.
➤ आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
➤ रिकाम्या पोटी थोडावेळ (शक्यतो सकाळच्या वेळी) शीर्षासन करावे.
➤ रात्री झोपताना दोन्ही नाकपुडीत गाईच्या तुपाचे १/२ थेंब टाकावेत. (एकाच वेळी दोन्ही नाकपुडीत तूप, तेल किंवा कोणतेही औषध टाकू नये.)
➤ शक्यतो घरी तयार केलेला किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचा "च्यवनप्राश" सांज-सकाळ १/१ चमचा घ्यावा.
➤ "आरोग्यवर्धिनीच्या" २/२ गोळ्या सांज-सकाळ पाण्याबरोबर घ्याव्यात.
➤ चिमटीभर 'काशिसभस्माचे' मधातून दिवसातून २ वेळा चाटण करावे.
➤ आवळकाठी चूर्ण, गोखरू चूर्ण, गुळवेल चूर्ण यांचे समभाग मिश्रण तयार करून त्यातील १/१ चमचा चूर्ण दिवसातून २ वेळा पाण्याबरोबर घ्यावे.
➤ "माक्याचे तेल" रात्री झोपताना केसांच्या मुळाशी हळुवारपणे चोळून लावावे.
➤ केस धुण्यासाठी आवळकाठी चूर्ण, शिकेकाई पावडर, नागरमोथा पावडर यांच्या समभाग मिश्रणात जास्वंदीची ताजी फुले वाटून घालून ते मिश्रण केस धुण्यासाठी वापरावे.
➤ "केशवर्धक तेल" रात्री झोपताना केसांच्या मुळाशी बोटाने चोळावे.
➤ पांढरे होत जाणारे केस फक्त बाह्योपचाराने काळे होत नाहीत. त्यासाठी योग्य जाणकार वैद्यांच्या सल्ल्याने पोटात देखील औषधे घेणे आवश्यक असते.
➤ केस सफेद होणे आनुवंशिक असू शकते. यावर अॅलोपॅथीमध्ये तरी आज खात्रीलायक उपचार नाहीत. म्हणून कोणाच्यातरी भरीस पडून त्या औषधी वापरू नयेत.
➤ सफेद केसांना लावण्यासाठी "ग्रेनील" या औषधीचा वापर करावा.
➤ आहारात जास्तीत जास्त गाईच्या अथवा साजुक तुपाचा वापर करावा.
➤ दिवसभरात ७/८ ग्लास तरी पाणी प्यावे.
➤ केसांना रंग देऊन (कलप करून) उन्हात फिरण्याने किंवा पोहोण्याने केस रंगहीन होतात. त्यासाठी उन्हात फिरताना डोक्याला स्कार्फ बांधावा किंवा टोपी घालावी तसेच पोहोताना स्विमिंग कॅप वापरावी.
➤ पोट साफ राखण्यासाठी रात्री झोपताना १/२ चमचे त्रिफळा चूर्ण किंवा पंचसकार चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
➤ पावसाळ्याच्या दिवसात टाकळ्याची कोवळी पाने धुवून चावून त्यांचा रस गिळावा व चोथा थुंकून टाकावा.
➤ "कोरफडसिध्द तेल" केसांना लावावे. याने केसांच्या वाढीस मदत होते.
➤ "षडबिंदू तेलाचे" २/२ थेंब दिवसातून २ वेळा दोन्ही नाकपुड्यांत (एकाच वेळी घालू नये) आलटून-पालटून योग्य वैद्यांच्या सल्ल्याने घालावेत.
➤ बाजारात तयार मिळणाऱ्या "हेना हेअर कंडिशनर" व "हेना मेंदी" यांचा वापर करावा.
➤ माका पावडर, काळे तीळ व आवळकाठीची पावडर यांचे समभाग मिश्रण तयार करून त्यांतील १/१ चमचा मिश्रण दिवसातून २ वेळा पाण्याबरोबर घ्यावे. हा उपचार किमान ५/६ महिने करावा.
➤ गुळवेल, आवळकाठी, मुस्ता यांच्या पावडरीचे समभाग मिश्रण तयार करून त्यातील १/१ चमचा मिश्रण दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर घ्यावे. हे औषधी मिश्रण सातत्याने वर्षभर तरी घ्यावे.
अर्धा चमचा 'प्रवाळभरम' रोज सकाळी दुधाबरोबर घ्यावे.
➤ "लायकोपोडीयम" (Lycopodium) हे होमिओपॅथिक औषध घ्यावे.
➤ रोज सकाळी "अणूतेलाचे" २/२ थेंब दोन्ही नाकपुड्यांत टाकावेत.
➤ "महाभृंगराज तेलाने" रात्री झोपताना केसांच्या मुळाशी हलकासा मसाज करावा.
➤ जागरण कटाक्षाने टाळावे.
➤ "नस्यतेलाचे" २ थेंब दोन्ही नाकपुड्यांत सकाळच्या वेळी घालावेत.
➤ ए, डी आणि ई जीवनसत्त्वयुक्त आहाराचे प्रमाण वाढवावे.
➤ वाटलेले २ चमचे सफेद तीळ व १ चमचा माक्याचा रस एकत्र कालवून त्याचा आठवड्यातून २/३ वेळा हेअर पॅक करावा.
➤ १ कप कॉफीच्या गरम पाण्यात १ कप मेंदी पावडर व अर्धा चमचा लिंबाचा रस घालून केसांना कलप करावा.
➤ रोज रात्री एक बदाम पाण्यात भिजत घालावा व सकाळी त्यावरील साल काढून खावा.
➤ रोज "बदाम तेलाचे" २ थेंब साखरेवर घालून ती साखर खावी.
➤ केस संपूर्ण पांढरे झाले असल्यास चांगल्या प्रकारचा हेअरडाय केसांसाठी वापरावा.
➤ पांढरे केस लपविण्यासाठी मेंदीचा हेअर पॅक करावा पण त्यासाठी जंगली मेंदीचा किंवा काळ्या मेंदीचा वापरू नये कारण तिचा देखील 'केमिकल डाय' सारखा परिणाम होतो.
➤ पांढऱ्या कोडावर वापरली जाणारी औषधे वापरून केस मुळापासून काळे करता येऊ शकतील किंवा कसे यावर आज संशोधन चालू आहे.
➤ केसांसाठी आम्ही या लेखात सांगितलेले कलप केसांना लावावे. ते कलप बनवण्याची कृती पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 👉💥Link💥👈
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.
🙏💐 धन्यवाद 💐🙏