केसांची अनावश्यक वाढ ♦️ केसांचे आरोग्य व घरगुती उपाय 🔥 Kesanchi Anavashyak Waadh 📌 Kesanche Aarogya v Gharguti Upay

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती

५. केसगळतीवर उपाय

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

. केेेस पिकणे

. केसांसाठी कलप

०. केसांचे नहाण

११. केसातील उवा लिखा

२. केसातील कोंडा

३. खवडा

१४. केसात चाई

१५. केसांची अनावश्यक वाढ

१६. काळी मेंदी

१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१८. केसांसाठी विविध तेले


केसांची अनावश्यक वाढ
अनेक स्त्रियांचा चेहरा, स्तन, छाती किंवा सर्वांगावर अनावश्यक केस असतात. अशा स्त्रियांना चारचौघांत उठणे-बसणे अवघड होते. शिवाय एक प्रकारचा न्युनगंड निर्माण होऊन अशा स्त्रियांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. अशा अनावश्यक केसांची वाढ रोखण्यासाठी तसेच हे केस काढून टाकण्यासाठी करावयाचे उपचार योग्य वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करणे जास्त हितावह असते. अशा काही उपचारांची येथे माहिती करून घेऊ.

 शरीरांतर्गत हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अशा प्रकारची अनावश्यक वाढ होत असते. योग्य औषधोपचाराने हार्मोन्सच्या असंतुलनावर नियंत्रण करून ही केसांची वाढ रोखता येते.

 लव असलेल्या भागावर 'वेखंडपूड' वरचेवर चोळून लावावी. याचा परिणाम ताबडतोब दिसून येत नाही पण एकदा लव गळून पडावयास सुरूवात झाली की परत त्याच जागेवर लव येत नाही. हा उपचार न कंटाळता किमान २/३ महिने तरी करणे आवश्यक असते.

 हळदीची पावडर व मोहरीचे कूट यांचे मिश्रण एकत्र खलून शरीरावर लावण्याने त्वचेवरून गळून पडलेली लव (केस) परत येत नाही.

 'प्युमिक स्टोन' नावाच्या बाजारात तयार मिळणाऱ्या दगडाने बाह्य त्वचा घासण्याने त्वचेवरील केस गळून पडतात. हा आयुर्वेदात सांगितलेला प्रकार नाही पण सध्या सर्वत्र प्रचलित असल्याने त्याची माहिती दिली आहे. करणाऱ्याने आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करावा.

 इलेक्ट्रोफिसिस किंवा इलेक्ट्रॉसिस या आधुनिक पध्दतीने अनावश्यक केस साफ करता येतात. पण या दोन्हीही पध्दतीमुळे शरीराचा तेवढा उपचार केलेला भाग काळसर पडण्याची शक्यता असते आणि असा काळसर पडलेला शरीराचा भाग परत पूर्ववत होणे जवळजवळ अशक्य असते. ही उपचारपध्दती अत्यंत त्रासदायक व वेळकाढू असते.
ही इलेक्ट्रोफिसिस किंवा इलेक्ट्रॉसिस पध्दत प्रत्यक्षात दोन प्रकारे उपयोगात आणली जाते. एका पध्दतीत डेपिलेशन तर दुसरीला एपिलेशन म्हणतात.
डेपिलेशन पध्दतीत मेण (व्हॅक्स) किंवा सुती धाग्याचा उपयोग करतात किंवा विविध रसायनयुक्त औषधे वापरून अनावश्यक केस काढले जातात.
डेपिलेशन पध्दतीत व्हॅक्सिंग हा मुख्य पण क्लेशदायक प्रकार असतो. पण सौंदर्यवान दिसण्याच्या हव्यासापोटी स्त्रिया या पध्दतीचा वरचेवर उपयोग करीत असतात.
एपिलेशन पध्दतीत एका विशिष्ट प्रकारच्या यंत्राच्या साहाय्याने केसांच्या मुळांना कमी दाबाच्या विद्युतप्रवाहाचा धक्का (शॉक) देऊन अनावश्यक केस उपटले जातात. पण हा उपचार साधारणपणे २/३ वर्षाचा कालावधी घेतो. सर्वसाधारणपणे सर्वच स्त्रियांना हा उपचार करून घेणे मानसिक इच्छा असली तरी प्रत्यक्षपणे तेवढा वेळ देणे अशक्य असते.


ब्लिचिंग : प्रत्यक्षात शरीराच्या कोणत्याही भागावरील लव काढता येत नाही. फक्त हा उपचार करण्याने शरीरावरील त्वचेला सोनेरी रंगाची छटा येते आणि त्यामुळे ही शरीरावरील लव चटकन नजरेत भरत नाही.

 ब्लिचिंग ही अनावश्यक केसांवरील प्रक्रिया खास करून ब्युटीपार्लरमध्ये जाऊन करून घेणे स्त्रियांना जास्त सोईस्कर वाटते. पण घरच्या घरी ब्लिचिंग करावयाचे असल्यास खालील प्रकारे करता येते.

 १ औंस हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये २० थेंब अमोनिया टाकून त्यात टाल्कम पावडर किंवा ब्लिचिंग पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. शरीराच्या कोणत्याही भागावर हे मिश्रण लावण्यापूर्वी यातील थोडेसे मिश्रण पायाच्या राठ त्वचेवर लावून पहावे. त्या भागावर मिश्रण लावल्याने जर चुरचुरले नाही तरच शरीराच्या ज्या भागावरील केस नको असतील त्या ठिकाणी हे मिश्रण लावावे, नंतर १०/१५ मिनिटांनी मिश्रण लावलेला भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करून त्यावर कोकम तेल किंवा कोल्ड क्रीम लावावे.


पर्मिंग, ब्लिचिंग केल्याने किंवा केसांसाठी अनेक प्रकारची रासायनिक औषधे वापरल्याने केसांना हमखास इजा पोहोचते. पर्मिंगसारख्या प्रक्रियेने केसांना कृत्रिम चमक येते हे जरी खरे असले तरी "पर्मिंग लोशन" मध्ये अनेक रासायनिक द्रव्ये असतात हे लक्षात घ्यावयास हवे, म्हणून पर्मिंग करण्यापूर्वी "ट्रयको अॅनालायझर" या यंत्राच्या साहाय्याने केसांची व त्यांच्या मुळांची निरोगी असण्याबाबतची तपासणी करून घ्यावी. या तपासणीत केसांच्या निरोगीपणाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावरच पर्मिंग करून घ्यावे, अन्यथा त्या फंदात न पडणे जास्त हितकर असते.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post