काही लोकांच्या डोक्यातील वेगवेगळ्या भागांतील केस अचानक गळून पडतात व तेथील त्वचेच्या गोलाकार भागावर चाई निर्माण होते. हा विकार दाढी, मिशी, भुवई, पापणी व शरीराच्या अन्य केसाच्छादित भागावर होऊ शकतो.
विशेषतः स्त्रीयांच्या डोक्यावरील केसात चाई पडण्याचे प्रमाण जास्त असते. स्त्रियांच्या या विकाराला "खालित्य" असे म्हणतात. पुरुषांच्या दाढी-मिशीला होणाऱ्या या रोगाला "इंद्रलुप्त" म्हणतात.
चाई पडल्यावर अनेक लोक अनेक सांगोपांगी उपचार करीत राहतात पण तोवर चाईने चांगलेच मूळ धरलेले असते. म्हणून चाई लक्षात आल्याबरोबर त्वरीत योग्य वैद्यांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
इंद्रलुप्तावर उपाय :
➤ पारव्याची विष्ठा पाण्यात जाडसर खलून 'इंद्रलुप्त' झालेल्या जागी त्याचा लेप करावा.
➤जेष्ठिमधादि तेल तयार करण्याची कृती : तिळाच्या तेलात चारोळी, जेष्ठीमध, कोष्ठ, सैंधव, जाई, कण्हेर, चित्रक, बहवा ही औषधे वाटून गोळा तेलात कालवावा व त्यात समभागे पाणी घालून तेल उकळवून सिध्द केलेले तेल गाळून घेऊन 'इंद्रलुप्त' झालेल्या जागी हळुवारपणे चोळून नियमितपणे लावावे.
खालित्यावर उपाय :
➤पुंडविकादितेलतयार करण्याची कृती : मोठे कमळ, जेष्ठीमध, पिंपळी, चंदन, लहान कमळ ही औषधे केसात चाई समभाग घेऊन एकत्र वाटून त्याचा गोळा तयार करावा. त्यात औषधाच्या १६ भाग तिळाचे तेल ३२ भाग आवळ्याचा अंगरस घालून मिश्रण मंदाग्नीवर उकळत ठेवावे. या मिश्रणातील फक्त तेलाचा अंश शिल्लक राहिल्यावर तेल गाळून घ्यावे व चाई झालेल्या जागेवर नियमितपणे, हळुवारपणे चोळून जिरवावे.
➤कडू पडवळाच्या पानांचा अंगरस काढून चाई पडलेल्या जागी चोळावा.
➤रिंगणीचा ताजा रस व मध एकत्र खलून चाई झालेल्या जागी चोळून लावावा.
➤पारिजातकाच्या बिया लिंबाच्या रसात उगाळून (खलून) त्याचा जाडसर लेप चाई झालेल्या जागी लावावा.
➤आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे.
➤"करंज तेल व बकुळीचे तेल" यांचे समभाग मिश्रण तयार करून चाई झालेल्या जागी चोळावे.
➤रात्री झोपताना "कपिलाचूर्ण' गुळात कालवून गरम पाण्याबरोबर घ्यावे.
➤२ चमचे "भल्लातकासव " समभाग पाण्यातून रात्री घ्यावे.
➤केस एक गठ्ठा जावयास सुरुवात झाली असता "फ्लोरीक अॅसिड" हे होमीओपॅथिक औषध देतात.
➤अर्जुन सादडाच्या सालीचे वस्त्रगाळ चूर्ण शुध्द खोबरेल तेलात खलून रात्री झोपण्यापूर्वी चाई झालेल्या जागी खसखसून चोळावे व सकाळी डोके रिठ्याच्या पाण्याने धुवावे.
➤१/१ चमचा 'रसायन चूर्ण' व ३/३ गोळ्या 'आरोग्यवर्धिनी' सांज-सकाळ पाण्याबरोबर घ्याव्यात. चाई पडण्याची कारणे : (१) अंगांत उष्णता वाढली असल्यास (कडकी असल्यास) (२) यकृताला सूज असल्यास (३) डोक्यावरील त्वचेला बुरशीचा संसर्ग झाला असल्यास
चाईमुळे डोक्यावरील त्वचा तेलकट व गुळगुळीत झाली असल्यास
➤केस गेलेल्या जागी "रोहिस तेल" (जिरेनियम ऑईल) चोळून जिरवावे.
➤"गंधक रसायनची" एक गोळी अर्धा चमचा साखरेत कालवून पाण्याबरोबर घ्यावी. याप्रमाणे दिवसातून तीन वेळा असे २/३ महिने हे औषध घ्यावे.
➤गुळवेल, आवळकाठी, नागरमोथा यांची समभाग पावडर एकत्र करून यातील १/१ चमचा मिश्रण रोज सकाळ-संध्याकाळी गाईच्या तुपात कालवून घ्यावे.
➤"ओ.आर्.पी.एल्. तेलाचा" १ थेंब चाई पडलेल्या एक इंच भागावर रात्री चोळून जिरवावा व त्यावर कुलिंजन पावडर लावावी. सकाळी डोके धुवावे.
➤डोक्यात फार उष्णता असल्यास ओ.आर्.पी.एल्. तेलात समभाग निमतेल घालून चाईवर लावण्यासाठी वापरावे.
➤कारंजाची फुले वाटून चाईवर लेप करावा.
चाई होऊन डोक्यावरील त्वचा रखरखीत झाली असल्यास :-
➤तज्ञ वैद्य या रखरखीत त्वचेवर जळू लावून तेथील दुषित रक्त काढून टाकतात.
➤जेष्ठीमध, चारोळी, कोष्ठ व सैंधव पाण्यात एकत्र वाटून त्याचा या रखरखीत त्वचेवर २१ दिवस लेप करावा.
केसात चाई पडल्यास :
➤जास्वंदीच्या फुलांचा अंगरस काढून चाई पडलेल्या जागी चोळावा.
➤माक्याचे तेल चाई पडलेल्या जागी चोळून जिरवावे.
➤*हस्तिदंतमशी, रसांजनाबरोबर बकरीच्या दुधात खलून केस जात असतील किंवा गेले असतील त्या जागी रोज लावावी.
टिप : *हस्तिदंत विशिष्ट पध्दतीने जाळून तयार केलेले भस्म, ते बाजारात उपलब्ध आहे.
➤रिंगणीचा रस मधात खलून चाई पडलेल्या जागी चोळावा.
➤पापणी व भुवयांचे केस गळत असल्यास व गलीत कुष्ठ किंवा डोळ्यांचे काही विकार नसतील तर "मालती भस्म" (टाकणखाराची लाही) मधात खलून लावावे.
➤अर्जुन सादड्याच्या सालीचे चूर्ण रात्री करंज तेल व शुध्द कापूर यात खलून दुसऱ्या दिवशी केसांच्या मुळांशी चोळावे. असे नियमितपणे ७ दिवस करावे.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.