केसांची वाढ होण्यासाठी - Stunted Hair Growth 🔥 केसांचे आरोग्य व घरगुती उपाय ♦️ Kesanchi Waadh HonyaSathi - Kesanche Aarogya v Gharguti Upay

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती

५. केसगळतीवर उपाय

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

८. केेेस पिकणे

९. केसांसाठी कलप

१०. केसांचे नहाण

११. केसातील उवा लिखा

१२. केसातील कोंडा

१३. खवडा

१४. केसात चाई

१५. केसांची अनावश्यक वाढ

१६. काळी मेंदी

१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१८. केसांसाठी विविध तेले


केसांची वाढ होण्यासाठी 
STUNTED HAIR GROWTH

केसांची वाढ खुंटली/थांबली असल्यास :


*हस्तीदंतमशीला दुर्वांच्या रसाच्या *भावना देऊन ती मशी आठवड्यातून २/३ वेळा केसांच्या मुळाशी हळुवारपणे चोळून लावावी.
चंदन, जेष्ठमध, त्रिफळा, निळी, जटामासी कांता, लहान कमळ, वडाच्या कोवळ्या पारंब्या यांचे समभाग पावडरींच्या मिश्रणात पूर्ण भिजेल इतका गुळवेलीचा रस घालून त्याच्या दुप्पट प्रमाणात खोबरेल तेल घालून मिश्रण बाटलीत भरून २ आठवडे उन्हात ठेवावे. मिश्रणाचे चांगले पाचन झाल्यावर तेल गाळून केसांना लावण्यास वापरावे.
वैद्यकीय सल्ल्याने "गव्हांकुरांचे तेल" (व्हिटजर्म ऑईल) पोटात घेण्याने केस व त्याखालील त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. 
केसांना उत्तम टॉनिक म्हणून "इ" जीवनसत्व असलेले "गव्हांकूर तेल" (व्हिटजर्म ऑईल) खोबरेल तेलात मिसळून केसांना लावण्यासाठी वापरावे.
जास्वंदीची फुले, ब्राम्ही, कापूर, मोतिया रोशा तेल व कोरफडीचा गर यांचे एकत्र पातळ मिश्रण तयार करून आठवड्यातून २ वेळा केसांच्या मुळाशी लावण्यासाठी वापरावे.


टीप : *हस्तीदंत शास्त्रोक्त पध्दतीने जाळून तयार केलेले भस्म 
 *मुळ औषधी दुसऱ्या वनौषधीच्या रसात भिजवून सुकवण्याच्या क्रियेला भावना देणे म्हणतात.


जपाकुसुमादि तेल तयार करण्याची कृती :

जास्वंदीची फुले, आवळा, ब्राम्ही, माका, बावची, कचूर सुगंधी, कडुनिम्बाची पाने यांचे समभाग मिश्रण ठेचून घेऊन ते खोबरेल तेलात घालून उकळवून तेल सिध्द करून घ्यावे. नंतर हे तेल गाळून त्यात मोतिया रोशा तेल टाकून केसांच्या मुळांना हळुवारपणे आठवड्यातून दोन वेळा चोळून लावावे.
अंकूर तेल (गव्हांकूर तेल) १० मिली, रोझमेरी तेल १० थेंब, लव्हेंडर तेल १० थेंब, जिरॅनियम तेल १० थेंब, ५० मिली खोबरेल तेलात घालून, बाटली चांगली हालवून हे तेल आठवड्यातून एक वेळा रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी नहाण करावे. याने मानसिक ताण कमी होऊन चांगली झोप लागते.
"मेझेरियम १ एम" या होमिओपॅथिकच्या गोळ्या एकावेळी ८/ ८ या प्रमाणात दिवसातून ३ वेळा अशा ३ महिने घ्याव्यात.
आहारात तांदूळज्याची (चवळाईची) भाजी घ्यावी.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post