✏️ अनुक्रमणिका
६. केसांची वाढ होण्यासाठी
७. टक्कल
८. केेेस पिकणे
९. केसांसाठी कलप
१०. केसांचे नहाण
११. केसातील उवा लिखा
१२. केसातील कोंडा
१३. खवडा
१४. केसात चाई
१५. केसांची अनावश्यक वाढ
१६. काळी मेंदी
१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१८. केसांसाठी विविध तेले
नेहमी हाताला डोके गरम लागत असेल किंवा शरीराला फार घाम येत असेल तर ती केस गळतीची लक्षणे समजावीत.
साधारणपणे ५५ वर्षापूर्वी टक्कल पडणाऱ्या पुरूषांना हुदयविकाराचा त्रास होतो. हे शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिध्द केले आहे. या विकाराला "मायोकार्डिनल इन्फार्कशन" (हृदस्नायुरक्तरोधज उतिअंत) असे संबोधले जाते. याचे मुख्य कारण "धमनी काठिण्य" (अँथरोस्क्लेरॉसिस) हे असू शकते असा तज्ञांचा अंदाज आहे.
पूर्वी फक्त वयस्कर पुरूषांनाच टक्कल पडलेले दिसून येत असे पण आज अनेक कारणांमुळे स्त्रियांनादेखील या संकटाला सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर विशीतील तरूणांनादेखील टक्कल पडावयास सुरू झालेले दिसते.
टक्कल पडण्याच्या सुरवातीला कपाळपट्टी रुंदावत जाते. त्यानंतर डोक्याच्या मध्य भागातील केस गळावयास लागतात आणि शेवटी डोक्याच्या इतर भागावरील केस डोक्याला रामराम ठोकतात.
टक्कल पडण्याची कारणे :
➤ अनुवंशिकता.
➤ शारीरिक बिघाडामुळे केसांची मुळे जर करपून गेली असतील तर टक्कल पडू शकते.
➤ वयाच्या ३५/४० नतर टक्कल पडावयास सुरूवात झाल्यास शरीरातील हार्मोन्समधील बदल त्याला कारणी भूत असू शकतात.
➤ उष्ण व पित्तज प्रकृती.
➤ यकृत व आतड्यांची सूज यांसारखे विकार.
➤ रक्तातील कोलेस्टोरेल व साखरेचे वाढलेले प्रमाण.
➤ केस धुण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक साबणांचा किंवा शांपूचा अतिरिक्त वापर.
➤ नहाणासाठीच्या पाण्यातील क्लोरीनचे आधिक्य.
➤ काही कारणाने रक्ताभिसरण मंदावले असल्यास.
➤ अंगात जास्त कडकी असल्यास.
➤ सततची डोकेदुखी.
➤ केसात उवा-लिखा जास्त प्रमाणात व नेहमी होत असल्यास त्यावर सतत केलेले प्रतिबंधात्मक उपाय.
➤ तीव्र वं दीर्घ मुदतीचा ताप.
➤ मोठ्या कालावधीचे आजारपण.
➤ मानसिक चिंता.
➤ स्त्रियांचे अत्यार्तव किंवा मासिक पाळीचे त्रास.
➤ डोक्यावरील त्वचेचे नीट रक्ताभिसरण होत नसल्यास.
➤ शरीरात चरबीचे प्रमाण वाढेल असा आहार घेतल्यास.
➤ सतत केस ओढत राहण्याची सवय.
➤ डोक्यात खवडे (खटे) वा त्वचा विकार झाला असल्यास.
टक्कल साधारण ३ प्रकारांत मोडते :
१) मानेच्या वरच्या बाजूस अर्धचंद्राकृती पडणारे टक्कल
२) कानाच्या वरच्या भागात पडणारे टक्कल
३) डोक्याच्या मध्यभागी टाळूवर पडणारे टक्कल
सर्वसाधारणपणे टक्कल पडल्यावर त्यावर केस येणे जवळजवळ अशक्य असते. टक्कल पडावयास सुरुवात झाल्यावर मात्र तातडीने टक्कल पडण्यामागील कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न केल्यास टक्कल पडण्याची प्रक्रिया मंदावली जाते. काहीअंशी रोखली जाते.
केस गळतीवरील उपाय वेळीच व योग्य मार्गदर्शनाखाली सुरू केल्यास टक्कल पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. केस गळतीवरील बाह्योपचारांबरोबरच पोटातील औषधे घेणे व काही पथ्ये पाळणे आवश्यक असते.
अनावश्यक आर्थिक हानी होऊ द्यावयाची नसेल व मानसिक ताण वाढवून अधिक नुकसान करून घ्यावयाचे नसेल तर टकलावर केस येऊ शकतील असे सांगणाराच्या मागे लागू नका ही माझ्या वाचकांना आग्रहाची विनंती.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.
🙏💐 धन्यवाद 💐🙏