केस गळती - केसांचे आरोग्य व घरगुती उपाय 🔴 Kes Galati - Kesanche Aarogya v Gharguti Upay

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती                       🎯

५. केसगळतीवर उपाय

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

८. केेेस पिकणे

९. केसांचे नहाण

१०. केसातील उवा लिखा

११. केसातील कोंडा

१२. खवडा

१३. केसात चाई

१४. केसांची अनावश्यक वाढ

१५. काळी मेंदी

१६. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१७. केसांसाठी विविध तेले


केस गळती


केस गळावयास लागले आहेत हे आपल्याला फार उशिरा लक्षात येते. केस मुळातून निर्जिव (मृत) होण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष केस गळती सुरू होण्यापूर्वी साधारण ३ महिने अगोदरच सुरू झालेली असते.


तरूण वयात केस गळण्याचे महत्वाचे कारण म्हणजे केसांच्या आरोग्याविषयीच्या काही चुकीच्या कल्पना. केस गळण्याची इतत्ही काही शारीरिक, मानसिक कारणे असू शकतात. पण केसगळतीची तक्रार करणार्या ७५ टक्के लोकांच्या डोक्यात कोंडा झालेला असतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे केसांना चिकटा बसतो या सबबीखाली केसांना अजिबात तेल न लावणे.


केस गळतीची काही कारणे


मानसिक अस्वास्थ्य (चिंता)

नहाणासाठी वापरावयाच्या पाण्यातील क्षार किंवा क्लोरीनचे आधिक्य,

 हेअर ड्रायरचा नेहमी वापर करणे. यामुळे केसांची रुक्षता वाढून केसांची मुळे सैल होऊन केस गळती सुरू होते.

 केस धुताना ते स्वच्छ निघावेत म्हणून विविध प्रकारच्या रसायनयुक्त शापूंचा व साबणांचा अतिरिक्त वापर करणे. 

केसात कोंडा, खवडे, उवा-लिखा झाल्याने केसांच्या मुळांना पुरेशी पोषक द्रव्ये मिळत नाहीत.

वातावरणातील प्रदूषण. 

हार्मोन्सचे असंतुलन.

 यकृताचे विकार. 

 अंगातील अतिरिक्त कडकी.

 पचनाचे विकार.

 अतिशय घाम येणे.

 केसांची अस्वच्छता. 

 डाएटिंगचे अवास्तव स्तोम.

 पोषक व समतोल आहाराचा अभाव.

 मोठे आजारपण.

 पंडूरोगामुळे (अॅनिमियामुळे) आलेला अशक्तपणा.

 अतिशय अंगमेहनत.

 रहाण्याच्या जागेतील बदल.

 अनुवंशिकता.

 केसांना नेहमी ब्लिचींग करणे. 

 बाजारी रसायनयुक्त तेलांचा वापर.

 वेगवेगळ्या प्रकारच्या बोजड व घट्ट हेअर पिन्सचा वापर. 

 नहाण केल्यावर फार वेळपर्यंत केस मोकळे ठेवून उन्हात सुकविण्याची सवय...

 मोठ्या आजारातील एक्स-रे थेरपीसारख्या विविध चाचण्या. 

 व्हिटॅमिन 'बी' व 'सी'च्या अभावामुळे रक्तातील लोह कमी झाल्यामुळे.

 केसांच्या मुळाशी तेल व धुळीचा बसलेला चिकटा नीट धुवून न काढल्याने केसांत होणारा कोंडा.

 नेहमी विविध रासायनिक उवानाशकांचा वापर.

 शरीरात प्रथिनांची कमतरता (प्रोटीन डिफिशिअन्सी) निर्माण झाल्यास केस गळतीचे प्रमाण वाढते.

 आहारात अचानक झालेला बदल. 

 विशिष्ट हेअर स्टाईल करण्याची प्रवृत्ती.

 काळ्या मेंदीचा वापर.

 केसांवर वरचेवर ब्रश फिरवण्याची सवय. 

 सततच्या जागरणामुळे झालेली अपुरी झोप. 

 केसांसाठी वरचेवर रसायनयुक्त डायचा केलेला वापर. 

 शरीरात झालेली अतिरिक्त पित्त वाढ. 

 बाळंतपण : बाळंतपणात स्त्रियांच्या केसगळतीचे प्रमाण जास्त असते. (योग्य आहार विहार असल्यास बाळंतपणानंतरच्या पुढील काही महिन्यांत त्यांच्या केसांची नैसर्गिक वाढ होण्यास सुरुवात होते.)

 अतिपोषाखी वृत्ती : ब्युटीपार्लरमध्ये जाऊन अनेक स्त्रिया आपल्या केसांचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात. खरेतर तशी काहीच आवश्यकता नसते आणि ही अनावश्यक घेतलेली काळजीच केसगळतीस कारणीभूत होते.

 स्त्रियांना वेणी (शेपटा) करकचून बांधण्याची सवय असते, त्यामुळे केसांच्या मुळावर अतिरिक्त ताण पडून केस कमजोर होऊन केस गळती सुरू होते.

 अनेक पुरुषांना वरचेवर केसांत बोटे घालून उगाचच केस ओढण्याची सवय असते, त्यामुळे केस गळती सुरू होऊ शकते.

 आपल्याकडे स्त्रियांच्या आहाराकडे पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही. अशा स्त्रियांना कुपोषणामुळे केस गळतीला तोंड देणे भाग पडते. 

 केस अस्वच्छ, चिकट राहणे, नहाणानंतर केस ओलेच असताना बांधणे.

 नेहमी कडक पाण्यानेच डोक्यावरून नहाण करणे.

 आजारपणात घेतलेल्या औषधींचे दुष्परिणाम (साईड इफेक्टस्) 

 खाण्यात नियमितपणे आंबट, तेलकट, खारट (उदा. लोणची, पापड, वडे, मिसळ वगैरे) अशा पदार्थांचा वापर.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post