✏️ अनुक्रमणिका
१३. खवडा
१४. केसात चाई
१५. केसांची अनावश्यक वाढ
१६. काळी मेंदी
१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१८. केसांसाठी विविध तेले
खवडा
(डोक्यातील फोड गुबडे)
➤ कडूकवठीचे तेल व चुन्याची निवळी एकत्र खलून तयार झालेले मलम खवड्यांवर लावावे.
➤ कपिला, करंज तेलात खलून गुबड्यावर लावावी.
➤ काव (गेरू) दह्यात उगाळून लावावा.
➤ गंध बिरोंजाचे तेल लावावे.
➤ केस संपूर्ण काढून टाकून डोक्यावर कंगव्याने थोडे हलकेसे खरवडून त्यावर १० ग्रॅम खोबरेल तेल, १० मिली लिंबाचा रस व २ ग्रॅम कापूर एकत्र करून मिश्रण चोळावे. असे आठवड्यातून २/३ वेळा करावे.
सबजाच्या पानांचा अंगरस काढून तो खवड्यावर जिरवावा.
➤ केसांत गुबडे झाली असता केस (डोके) धुण्यासाठी कडूनिंबाच्या पानांच्या रसाचा वापर करावा.
➤ ५ ग्रॅम शुध्द कापूर ५० मिली खोबरेल तेलात खलून रोज रात्री केसांच्या खाली त्वचेवर चोळून लावावे.
➤ लिंबाच्या रसात थोडी अफू घालून खवड्यावर चोळावी.
➤ करंज तेलात कापूर खलून खवड्यावर एक दिवसाआड चोळून लावावा. सकाळी डोके धुवावे.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.
🙏💐 धन्यवाद 💐🙏