केसांचे सर्वसाधारण आरोग्य - केसांचे आरोग्य व घरगुती उपाय | Kesanche SarvaSadharan Aarogya - Kesanche Aarogya V Gharguti Upay

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती

५. केसगळतीवर उपाय

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

८. केेेस पिकणे

९. केसांचे नहाण

१०. केसातील उवा लिखा

११. केसातील कोंडा

१२. खवडा

१३. केसात चाई

१४. केसांची अनावश्यक वाढ

१५. काळी मेंदी

१६. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१७. केसांसाठी विविध तेले


केसांचे सर्वसाधारण आरोग्य लांबसडक, काळेभोर किंवा पिंगट मुलायम केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचे एक लक्षण मानले जाते. आपण आपल्या केसांची कशी काळजी घेतो यावर आपल्या केसांचे आरोग्य अवलंबून असते.  आपण एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्या डोक्यावर असलेले केस हे आपल्या कफ, वात आणि पित्त प्रकृती प्रमाणे असतात. त्यांचा गुणधर्म बदलणे आपल्या हाती नसले तरी ते व्यवस्थित राखणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आपले केस नेहमी साफ ठेवणे, व्यवस्थित विंचरणे तसेच केस नेहमी आकर्षक दिसावे म्हणून त्यावर बाह्यक्रिया करणे हे जसे आपल्या हातात आहे तसेच शरीरातून त्यांना उपयुक्त औषधी देणे आणि वात-पित्त-कफ यांचा समतोल राखणे हे तितकेच आवश्यक आहे.  आपल्या शरीरातील बदलच नव्हे तर मानसिक बदलांचा परिणाम देखील केसांवर होतो.  रोज केसांना वेगवेगळ्या गोष्टींशी सामना करावा लागतो, त्यात सर्वात जास्त संबंध हवा व पाण्याशी येत असतो. वेगवेगळ्या हवामानात केसावर वेगवेगळे परिणाम होतात. उष्ण, थंड, सुकी आणि दमट हवा यात केस सुके, कडक, नरम, मुलायम आणि चिकट होतात. प्रत्येकाच्या प्रकृतिधर्माप्रमाणे हे बदल होत असतात. हवेप्रमाणे पाण्याच्या गुणधर्माचे परिणाम केसावर प्रतीत होतात. खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात, हलक्या किंवा जड पाण्यात, क्लोरीनचे प्रमाण जास्त असलेल्या पाण्यात केसांचे रंगरूप बदलविणारे गुणधर्म असतात.  नेहमी तरण तलावांत (स्विमिंग पूल) पोहोणाऱ्यांचे केस इतरांच्या मानाने रुक्ष असतात.  केसांची निर्मिती करेटिन्स नावाच्या तंतुयुक्त प्रथिनांपासून होते. केसांची वाढ साधारणपणे वयाच्या १ ते ५ वर्षापर्यंत होत असते. त्यानंतर मूळ केसांची वाढ होणे बंद होते. नंतर फक्त जुन्या केसांची जागा नवीन केस घेण्याची प्रक्रिया सुरू होते.  शरीरावरील कोणत्याही केसांना स्पर्शज्ञान नसते. केस मुळातून बाहेर पडल्यावर त्याचा डोक्यावरील दृश्य भाग मृतावस्थेत असतो. केसांची दरमहा साधारणपणे १० ते २० मि.मि. पर्यंत वाढ होत असते. उन्हाळ्यात मात्र केसवाढीचे प्रमाण इतर मोसमापेक्षा थोडे अधिक असते.  सामान्यपणे रोज १०० केस तरी गळत असतात व त्या जागी नवीन येणारे केस, आपले आयुष्य ५/६ वर्षापर्यंत टिकवून असतात. हे केसगळती व वाढीचे चक्र ठराविक क्रमाने व विशिष्ट प्रमाणात केसांच्या नैसर्गिक अवस्थेत अव्याहत चालू असते.  'सेबॅकस' ग्रंथीतून द्रवणाऱ्या 'सीबम' या तेलकट द्रावामुळे केसांना बंगणासारखी तेलकटी कायम असते. काहींचा असा समज असतो कि केसांच्या या तेलकटीमुळे केसांना बाह्य तेलाची गरज नसते, पण ते चुकीचे आहे.  केसांची नीट वाढ होण्यासाठी केसांच्या मुळांना नीट व पुरेसा रक्तपुरवठा होणे आवश्यक असते. त्यासाठी डोक्यावरील संपूर्ण त्वचेचे रक्ताभिसरण सुरळीत चालू राहणे आवश्यक असते. त्यामुळे वरचेवर केस कापण्याने केसांची चांगली वाट होते हा विचार गैरलागू ठरतो.  काळेभोर केस हे दिसावयास सुंदर दिसतात पण कडक उन्हामुळे काळ्या केसात लवकर निर्जलिकरण (डि-हायड्रेशन) सुरू होते.   स्त्रियांचे केस एक प्रकारची जीवनशक्ती धारण करतात असा आजवरचा एक समज होता, पण आजकालच्या स्त्रियांच्या केसांची एकंदर परिस्थिती पहाता हा समज फोल ठरला आहे.   केसांची योग्य काळजी न घेण्याने केसांसंबंधी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. उदा. केसात कोंडा पडणे, उबा- लिखा पडणे, केस गळती सुरू होणे, केस अकाली पांढरे होणे, टक्कल पडणे, चाई पडणे वगैरे.   ❛❛ खालील गोष्टींची वेळीच काळजी घेतल्यास पुढे निर्माण होणाऱ्या केसांच्या समस्या टाळणे, कमी करणे शक्य होऊ शकते. ❜❜  ➤ कोणतेही रासायनिक द्रव्य केसांना लावू नये.  ➤ अप्रिय वासाच्या तेलांचा केसांना लावण्यासाठी उपयोग करू नये.  ➤ केसांची काळजी घेताना वा केसांच्या तक्रारीवर उपचार सुरू करण्यापूर्वी पोट साफ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी साधारण आठवडाभर रोज रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. ➤ डोक्यावरील त्वचेला उष्ण पडतील अशा कोणत्याही वनौषधींचा वापर करू नये.  ➤ केसांच्या मुळाशी तेलाचा चिकटा बसू नये म्हणून केसांना आठवड्यातून दोन वेळाच तेल लावावे. ➤ केस विंचरण्यासाठी दुसऱ्याचा कंगवा किंवा ब्रश वापरू नये.  ➤ सुगंधी तेलाने केसांना मसाज केल्यास केसांचा पोत व रंग बदलण्याची शक्यता असते. ➤ केसावर एकदम गरम पाणी टाकून न धूता केस हातावर घेऊन गरम पाण्याने धुवावेत. ➤ केस वरचेवर खूप वेळा विंचरू नयेत. ➤ केस सरळ करणे किंवा कुरळे करणे, त्यांना ब्लिचींग करणे यांसारख्या क्रिया एकाचवेळी न करता एका वेळी एकच प्रकार करावा. ➤ स्वतःचाच कंगवा, ब्रश, फणी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून कोरडी करूनच वापरावी. ➤ केस साफ करण्यासाठी नेहमी स्वच्छ व मऊसर ब्रशचा वापर करावा.  ➤ केसांना मालिश करताना केस खसाखसा चोळू नयेत, तर बोटांच्या टोकाने हळुवारपणे चोळावेत. ➤ केसांना नेहमी तेल लावताना तेल थोडे कोमट करून घेऊन बोटांच्या टोकांनी केसांच्या मुळांना लावावे. ➤ केसांना रात्री झोपतानाच तेल लावावे. दिवसा तेल लावून बाहेर पडल्यास त्यावर धुळ बसून केसांना चिकटा बसू शकतो. ➤ केस विंचरण्यासाठी शक्यतो मोठ्या दात्यांचा कंगवा वापरावा. ➤ केस विंचरताना कंगवा, फणी किंवा ब्रश केसांच्या मुळांपासून फिरेल असे पाहावे. त्यामुळे डोक्यावरील त्वचेचे रक्ताभिसरण चांगले होऊन केसांना आवश्यक ती पोषकद्रव्ये केसांच्या मुळावाटे रक्तातून सुलभपणे मिळू शकतात.  ➤ केसाकडील त्वचेचे नीट रक्ताभिसरण न झाल्यास, मोडका कंगवा, खराब ब्रश बापरण्याने केस दुंगून मृतवत होतात व अनाकर्षक दिसतात. अशा केसांच्या आरोग्यासाठी "हर्बग्लो" हे तयार औषध वापरावे तसेच अशा दुभंगलेल्या केसांची टोके  वरचेवर कापावीत. ➤ आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर करावा. ➤ आहारात अंडी, मासे, कलेजी, कॉडलिव्हर ऑईल, हिरव्या पालेभाज्या, गाजर, लिंबूवर्गातील फळे इत्यादिंचा पुरेसा समावेश करावा. ➤ केसांची निरोगी वाढ होण्यासाठी फरसाण, पाव, बिस्किटे, चॉकलेटस्, बाजारी शीतपेये इत्यादि खाद्यपेयांना फाटा द्यावा. अगदीच आवश्यकता असल्यास कमीत कमी वापर करावा.  केसांचे विकार असे आहेत कि ते उद्भवल्यास नेहमीच्या दिनक्रमात फारसा बदल होत नाही, तसेच शरीरास काही त्रास जाणवत. नाही. त्यामुळे आजच्या व्यस्त दिनक्रमात केसांकडे अजाणतेपणे दुर्लक्ष होते व पुढे केसांच्या समस्यांत वाढ झाल्यावर नाहक मनस्ताप होत राहतो. म्हणून वेळीच योग्य ती काळजी घ्यावी.   केसांच्या सौंदर्याबाबत अति जागरूक असणाऱ्या व्यक्ती वारंवार केस शांपूने धुणे, वेगवेगळे साबण वापरणे, हेअर ड्रायरचा वापर करणे अशा, केसांना हानिकारक गोष्टी सतत करीत असतात. त्या मनाचा संयम बाळगून टाळाव्यात.  केसाच्या लावण्याचा विचार करताना उवा, लिखा, कोंडा, केसांच्या वाढीचे प्रमाण, केसांचा रंग, पोत वगैरे गोष्टींचा सारासार विचार करूनच केसांसाठी वापरावयाच्या औषधांची निवड करावी.  ✔ अतिमद्यपान तसेच धुम्रपान वर्ज्य करावे. ✔ उगाचच चिंता करण्याचे सोडून द्यावे. ✔ पिकलेले केस कधीही उपटून काढू नयेत. असे केस उपटण्यामुळे त्याच्या आजुबाजूचे केस मात्र मोठ्या प्रमाणावर पिकू लागतात. ✔ सतत उत्साही व प्रसन्न राहण्याने केसांची चमक नैसर्गिकरित्याच वाढु लागते. ✔ योग्य मार्गदर्शनाखाली शवासनाचा व्यायाम नियमितपणे घ्यावा.

केसांचे सर्वसाधारण आरोग्य

लांबसडक, काळेभोर किंवा पिंगट मुलायम केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचे एक लक्षण मानले जाते. आपण आपल्या केसांची कशी काळजी घेतो यावर आपल्या केसांचे आरोग्य अवलंबून असते.


आपण एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्या डोक्यावर असलेले केस हे आपल्या कफ, वात आणि पित्त प्रकृती प्रमाणे असतात. त्यांचा गुणधर्म बदलणे आपल्या हाती नसले तरी ते व्यवस्थित राखणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आपले केस नेहमी साफ ठेवणे, व्यवस्थित विंचरणे तसेच केस नेहमी आकर्षक दिसावे म्हणून त्यावर बाह्यक्रिया करणे हे जसे आपल्या हातात आहे तसेच शरीरातून त्यांना उपयुक्त औषधी देणे आणि वात-पित्त-कफ यांचा समतोल राखणे हे तितकेच आवश्यक आहे.


आपल्या शरीरातील बदलच नव्हे तर मानसिक बदलांचा परिणाम देखील केसांवर होतो.


रोज केसांना वेगवेगळ्या गोष्टींशी सामना करावा लागतो, त्यात सर्वात जास्त संबंध हवा व पाण्याशी येत असतो. वेगवेगळ्या हवामानात केसावर वेगवेगळे परिणाम होतात. उष्ण, थंड, सुकी आणि दमट हवा यात केस सुके, कडक, नरम, मुलायम आणि चिकट होतात. प्रत्येकाच्या प्रकृतिधर्माप्रमाणे हे बदल होत असतात. हवेप्रमाणे पाण्याच्या गुणधर्माचे परिणाम केसावर प्रतीत होतात. खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात, हलक्या किंवा जड पाण्यात, क्लोरीनचे प्रमाण जास्त असलेल्या पाण्यात केसांचे रंगरूप बदलविणारे गुणधर्म असतात.


नेहमी तरण तलावांत (स्विमिंग पूल) पोहोणाऱ्यांचे केस इतरांच्या मानाने रुक्ष असतात.


केसांची निर्मिती करेटिन्स नावाच्या तंतुयुक्त प्रथिनांपासून होते. केसांची वाढ साधारणपणे वयाच्या १ ते ५ वर्षापर्यंत होत असते. त्यानंतर मूळ केसांची वाढ होणे बंद होते. नंतर फक्त जुन्या केसांची जागा नवीन केस घेण्याची प्रक्रिया सुरू होते.


शरीरावरील कोणत्याही केसांना स्पर्शज्ञान नसते. केस मुळातून बाहेर पडल्यावर त्याचा डोक्यावरील दृश्य भाग मृतावस्थेत असतो. केसांची दरमहा साधारणपणे १० ते २० मि.मि. पर्यंत वाढ होत असते. उन्हाळ्यात मात्र केसवाढीचे प्रमाण इतर मोसमापेक्षा थोडे अधिक असते.


सामान्यपणे रोज १०० केस तरी गळत असतात व त्या जागी नवीन येणारे केस, आपले आयुष्य ५/६ वर्षापर्यंत टिकवून असतात. हे केसगळती व वाढीचे चक्र ठराविक क्रमाने व विशिष्ट प्रमाणात केसांच्या नैसर्गिक अवस्थेत अव्याहत चालू असते.


'सेबॅकस' ग्रंथीतून द्रवणाऱ्या 'सीबम' या तेलकट द्रावामुळे केसांना वंगणासारखी तेलकटी कायम असते. काहींचा असा समज असतो कि केसांच्या या तेलकटीमुळे केसांना बाह्य तेलाची गरज नसते, पण ते चुकीचे आहे.


केसांची नीट वाढ होण्यासाठी केसांच्या मुळांना नीट व पुरेसा रक्तपुरवठा होणे आवश्यक असते. त्यासाठी डोक्यावरील संपूर्ण त्वचेचे रक्ताभिसरण सुरळीत चालू राहणे आवश्यक असते. त्यामुळे वरचेवर केस कापण्याने केसांची चांगली वाट होते हा विचार गैरलागू ठरतो.


काळेभोर केस हे दिसावयास सुंदर दिसतात पण कडक उन्हामुळे काळ्या केसात लवकर निर्जलिकरण (डि-हायड्रेशन) सुरू होते. 


स्त्रियांचे केस एक प्रकारची जीवनशक्ती धारण करतात असा आजवरचा एक समज होता, पण आजकालच्या स्त्रियांच्या केसांची एकंदर परिस्थिती पहाता हा समज फोल ठरला आहे.


केसांची योग्य काळजी न घेण्याने केसांसंबंधी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. उदा. केसात कोंडा पडणे, उबा- लिखा पडणे, केस गळती सुरू होणे, केस अकाली पांढरे होणे, टक्कल पडणे, चाई पडणे वगैरे. 


❛❛ खालील गोष्टींची वेळीच काळजी घेतल्यास पुढे निर्माण होणाऱ्या केसांच्या समस्या टाळणे, कमी करणे शक्य होऊ शकते. ❜❜


कोणतेही रासायनिक द्रव्य केसांना लावू नये. 

अप्रिय वासाच्या तेलांचा केसांना लावण्यासाठी उपयोग करू नये.

केसांची काळजी घेताना वा केसांच्या तक्रारीवर उपचार सुरू करण्यापूर्वी पोट साफ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी साधारण आठवडाभर रोज रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.

डोक्यावरील त्वचेला उष्ण पडतील अशा कोणत्याही वनौषधींचा वापर करू नये. 

केसांच्या मुळाशी तेलाचा चिकटा बसू नये म्हणून केसांना आठवड्यातून दोन वेळाच तेल लावावे.

केस विंचरण्यासाठी दुसऱ्याचा कंगवा किंवा ब्रश वापरू नये. 

सुगंधी तेलाने केसांना मसाज केल्यास केसांचा पोत व रंग बदलण्याची शक्यता असते.

केसावर एकदम गरम पाणी टाकून न धूता केस हातावर घेऊन गरम पाण्याने धुवावेत.

केस वरचेवर खूप वेळा विंचरू नयेत.

केस सरळ करणे किंवा कुरळे करणे, त्यांना ब्लिचींग करणे यांसारख्या क्रिया एकाचवेळी न करता एका वेळी एकच प्रकार करावा.

स्वतःचाच कंगवा, ब्रश, फणी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून कोरडी करूनच वापरावी.

केस साफ करण्यासाठी नेहमी स्वच्छ व मऊसर ब्रशचा वापर करावा.

केसांना मालिश करताना केस खसाखसा चोळू नयेत, तर बोटांच्या टोकाने हळुवारपणे चोळावेत.

केसांना नेहमी तेल लावताना तेल थोडे कोमट करून घेऊन बोटांच्या टोकांनी केसांच्या मुळांना लावावे.

केसांना रात्री झोपतानाच तेल लावावे. दिवसा तेल लावून बाहेर पडल्यास त्यावर धुळ बसून केसांना चिकटा बसू शकतो.

केस विंचरण्यासाठी शक्यतो मोठ्या दात्यांचा कंगवा वापरावा.

केस विंचरताना कंगवा, फणी किंवा ब्रश केसांच्या मुळांपासून फिरेल असे पाहावे. त्यामुळे डोक्यावरील त्वचेचे रक्ताभिसरण चांगले होऊन केसांना आवश्यक ती पोषकद्रव्ये केसांच्या मुळावाटे रक्तातून सुलभपणे मिळू शकतात.

केसाकडील त्वचेचे नीट रक्ताभिसरण न झाल्यास, मोडका कंगवा, खराब ब्रश बापरण्याने केस दुंगून मृतवत होतात व अनाकर्षक दिसतात. अशा केसांच्या आरोग्यासाठी "हर्बग्लो" हे तयार औषध वापरावे तसेच अशा दुभंगलेल्या केसांची टोके वरचेवर कापावीत.

आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर करावा.

आहारात अंडी, मासे, कलेजी, कॉडलिव्हर ऑईल, हिरव्या पालेभाज्या, गाजर, लिंबूवर्गातील फळे इत्यादिंचा पुरेसा समावेश करावा.

केसांची निरोगी वाढ होण्यासाठी फरसाण, पाव, बिस्किटे, चॉकलेटस्, बाजारी शीतपेये इत्यादि खाद्यपेयांना फाटा द्यावा. अगदीच आवश्यकता असल्यास कमीत कमी वापर करावा.


केसांचे विकार असे आहेत कि ते उद्भवल्यास नेहमीच्या दिनक्रमात फारसा बदल होत नाही, तसेच शरीरास काही त्रास जाणवत. नाही. त्यामुळे आजच्या व्यस्त दिनक्रमात केसांकडे अजाणतेपणे दुर्लक्ष होते व पुढे केसांच्या समस्यांत वाढ झाल्यावर नाहक मनस्ताप होत राहतो. म्हणून वेळीच योग्य ती काळजी घ्यावी. 


केसांच्या सौंदर्याबाबत अति जागरूक असणाऱ्या व्यक्ती वारंवार केस शांपूने धुणे, वेगवेगळे साबण वापरणे, हेअर ड्रायरचा वापर करणे अशा, केसांना हानिकारक गोष्टी सतत करीत असतात. त्या मनाचा संयम बाळगून टाळाव्यात.


केसाच्या लावण्याचा विचार करताना उवा, लिखा, कोंडा, केसांच्या वाढीचे प्रमाण, केसांचा रंग, पोत वगैरे गोष्टींचा सारासार विचार करूनच केसांसाठी वापरावयाच्या औषधांची निवड करावी.


अतिमद्यपान तसेच धुम्रपान वर्ज्य करावे.
उगाचच चिंता करण्याचे सोडून द्यावे.
पिकलेले केस कधीही उपटून काढू नयेत. असे केस उपटण्यामुळे त्याच्या आजुबाजूचे केस मात्र मोठ्या प्रमाणावर पिकू लागतात.
सतत उत्साही व प्रसन्न राहण्याने केसांची चमक नैसर्गिकरित्याच वाढु लागते.
योग्य मार्गदर्शनाखाली शवासनाचा व्यायाम नियमितपणे घ्यावा.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post