केसात कोंडा होण्याची कारणे ♦️ केसातील कोंड्यावर प्रतिबंधात्मक उपाय 🔥 Kesat Konda Honyachi Karane 📌 Konda Kasa Thambvayacha

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती

५. केसगळतीवर उपाय

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

. केेेस पिकणे

. केसांसाठी कलप

०. केसांचे नहाण

१. केसातील उवा लिखा

१२. केसातील कोंडा

१३. खवडा

१४. केसात चाई

१५. केसांची अनावश्यक वाढ

१६. काळी मेंदी

१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१८. केसांसाठी विविध तेले


केसातील कोंडा
केसात कोंडा होणे हा एक संसर्गजन्य विकार आहे. केसातील कोंडा दिसावयास सारखाच असला तरी त्याचे दोन प्रकार आहेत. (१) कोरडा कोंडा व (२) तेलकट कोंडा. कोरडा कोंडा हा साधारणपणे कोरड्या केसांतच होतो तर तेलकट कोंडा हा तेलकट केसांतच होतो.

(१) कोरडा कोंडा :
कोरड्या केसांत जास्त प्रमाणात कोंडा झाल्यास तो सतत चेहऱ्यावर पडत राहतो. सतत तोंडावर कोंडा पडत राहिल्याने तोंडावर मुरमे उठतात. केसात कोंडा झाल्याने डोक्यात सतत कंड येते व केसात खाजवत राहिल्याने नख लागून केसात (डोक्यावरील त्वचेवर) जखमा होण्याची शक्यता असते. केसात जखमा झाल्यास केस गळून पडतात, तुटतात. हाच त्रास मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर केस गळती सुरू होऊन टक्कल पडण्याची शक्यता निर्माण होते. इतकेच नव्हे तर डोक्यातील कोंडा, भुवया आणि पापण्यांवरील केसांवर पडून त्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता असते.
(२) तेलकट कोंडा :
साधारणपणे तेलकट कोंडा गळून न पडता केसांच्या मुळाशी चिकटून राहतो. त्याची केसांच्या मुळाकडील त्वचेवर पापडी तयार होऊन केसांच्या मुळांपर्यंत हवा देखील पोहोचू शकत नाही. फलस्वरूप केस कमजोर होतात व केसगळती सुरू होते.
केसात कोंडा होण्याची कारणे :
केसांची अस्वच्छता.

 केसांच्या मुळाकडील तैलग्रंथी आवश्यकतेपेक्षा अधिक कार्यप्रवण होणे. 

 दुसऱ्या व्यक्तीचा कंगवा, फणी, ब्रश यांसारखी साधने वापरणे.

 स्वतःचा कंगवा, फणी, ब्रश, टॉवेल नेहमी अस्वच्छ असणे. 

 नेहमी रासायनिक शांपूचा, तोदेखील वेगवेगळ्या कंपन्यांचा वापरणे. 

 केस धुण्यासाठी हलक्या प्रतीचा साबू किंवा शांपूचा नेहमी वापर करणे.

 शरीरांतर्गत हार्मोन्सचे असंतुलन.

 स्त्रीयांची कष्टप्रद अनियमित मासिक पाळी. 

 सततचा मानसिक तणाव व थकवा.

 केस नीट न धुण्याने केसांच्या मुळांशी शांपू किंवा साबूनचा थर साचून त्याचा केसांच्या मुळावर होणारा गंभीर परिणाम.

 केसांच्या मुळांना अजिबात व्यायाम न देणे. (मसाज न करणे)

 नेहमी असंतुलित आहार घेणे.

 नहाणानंतर नेहमी केस ओले बांधणे.

 केसांना नेहमी तेल-पाण्याचे मिश्रण चोपडणे. 

 घरातील पाळीव कुत्र्याला रेबीजचे इंजेक्शन दिले असले तरी त्याच्या संसर्गाने केसात कोंडा होऊ शकतो.


केसातील कोंड्यावर प्रतिबंधात्मक उपचार :

 केस धुण्यासाठी सांगितलेल्या कोणत्याही औषधीत २५ ग्रॅम उपलसरी चूर्ण व १५ ग्रॅम शुध्द कापूर घालून ते नहाणासाठी वापरावे. 

 १ भाग सफरचंदाचा रस व ३ भाग पाणी यांच्या मिश्रणाने केस धुवावेत. 

 दुधात खसखस वाटून केसांच्या मुळाशी मिश्रण चोळून लावावे. अर्ध्या तासानंतर डोके धुवावे. 

 उन्हात फिरणे टाळावे. ते शक्य नसल्यास छत्री किंवा टोपी वापरावी.

 केस धुण्यासाठी बाजारी सोप, शांपूचा वापर वर्ज्य करावा. 

 केसांना "मेंदीचा हेअर पॅक" केल्याने डोक्यावरील त्वचेतील आम्लता कमी होऊन कोंड्याचे प्रमाण कमी होऊ शकते. 

 "दह्यात लिंबाचा रस" घालून चांगले खलून त्याचा हेअर पॅक करावा. अर्ध्या तासानंतर नहाण करावे.

 "हेअर लाईफ" हे हेअर टॉनिक १ चमचा प्रमाणात घेऊन अर्धा कप कोमट पाण्यात घालून त्यात एका अंड्यातील पांढरा बलक फेसून अर्धा तास केसांना पॅक करावा. नंतर “लिचीड शिकेकाई" (नॅचरोडॅन) लावून नहाण करावे. आठवड्यातून किमान २ वेळा असे करण्याने केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. 

 नागरमोथा १ चमचा, कचूर सुगंधी १ चमचा, संत्र्याची साल १ चमचा, त्रिफळा १ चमचा यांचे चूर्ण ८ चमचे कोरफडीच्या गरात कालवून त्यात मोतिया रोशा तेलाचे ५ थेंब टाकून मिश्रण केसांच्या मुळांशी लावावे. हेच मिश्रण अधिक प्रभावी होण्यासाठी त्यात १ चमचा दही किंवा १ चमचा लिंबचा रस घालावा. केसांना हे मिश्रण लावल्यानंतर अर्ध्या तासाने नहाण करावे. आठवड्यातून २ वेळा असे महिनाभर हा प्रयोग करावा.

 खोबरेल तेल व युकॅलिप्टस् तेल (निलगिरी तेल) यांचे मिश्रण करून केसांच्या मुळाशी त्वचेवर बोटाने चोळून लावावे.

 आंबट दह्यात आमलकी चूर्ण घालून चांगले घोटून केसांच्या मुळांशी लावावे. २० मिनिटानंतर केस कोमट पाण्याने धुवावेत.

 सीताफळीच्या पानांचा रस व पेरूच्या पानांचा रस समभाग घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून केसांच्या मुळाशी चोळून लावावा. अर्ध्या तासानंतर डोके धुवावे.

 केसांसाठी काळ्या मेंदीचा वापर करू नये. 

 कोणताही रसायनयुक्त डाय केसांना लावू नये.

 दुसऱ्याचे टॉवेल, उशीची कव्हर्स, बेडशीटस् वापरू नयेत. 

 केसांना आठवड्यातून २ वेळा तरी निमतेल (कटुनिंबाचे तेल) लावावे.

 अंडे, दही यांच्या मिश्रणात मेंदीची पावडर टाकून चांगले घुसळून केसांसाठी पातळसर पॅक तयार करावा. पॅक लावल्यानंतर अर्ध्या तासाने स्नान (नहाण करावे.)

 "डीप सलायक" (Deep Saliac) नावाचे बाजारात उपलब्ध असलेले मलम बोटांनी केसांच्या मुळांशी चोळावे. नंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून पिळून केसांना लपेटून वाफारा घ्यावा. 

 ३/४ पिकलेल्या टोमॅटोंचा गर काढून गाळणीतून मथून घेऊन केसांच्या मुळांशी त्याने २/३ मिनिटे मसाज करावा. हा गर संपूर्ण सुकण्यापूर्वी नहाण करावे.

 ५० मिली खोबरेल तेलात ५ मिली जोजोबा तेल, १५ थेंब रोझमेरी तेल, १० थेंब निलगिरी तेल मिसळून मिश्रण चांगले हालवून बोटाने केसांच्या मुळांशी लावावे.

 करंज तेलात कापूर मिसळून केसांच्या मुळाशी रात्री लावावा. सकाळी केस धुण्यासाठी बावची चूर्ण, शिकेकाई पावडर आवळकाठी चूर्ण व नागरमोथा पावडर यांचे समभाग मिश्रण तयार करून आवश्यकतेनुसार वापरावे.

 रात्री झोपताना कपिला चूर्ण व गूळ गरम पाण्याबरोबर घ्यावे. 

 मंजिष्ठादी चूर्ण व त्रिफळा चूर्ण समभाग एकत्र करून ठेवावे. त्यातील १ चमचा चूर्ण कोमट पाण्याबरोबर रात्री झोपताना घ्यावे.

 गंधक तेल व खोबरेल तेल यांचे मिश्रण तयार करून आठवड्यातून २ वेळा झोपताना केसांच्या मुळाशी बोटाने हळुवारपणे चोळून सकाळी नहाण करावे.

 कोंडा प्रतिबंधक "ड्रन्ड्रॉफ" या औषधाचा केसासाठी वापर करावा.

 'गंधक रसायनाच्या' २/२ गोळ्या दिवसातून २ वेळा 'महामंजिष्ठादी काढा' किंवा 'वरुणादी काढ्या'सोबत किमान आठ दिवस घ्याव्यात. 

 कारल्याच्या वेलीची पाने व कारली यांचा वेगवेगळा रस काढून नंतर एकत्र करून केसांना लावावा. अर्ध्या तासानंतर नहाण करावे. केस धुण्यासाठी रिठा किंवा "चंद्रिका आयुर्वेदिक सोप"चा व्यापर करावा. हा प्रयोग किमान २१ दिवस करावा.

 सतत खाजवत राहण्याने केसातील कोंड्याचे प्रमाण वाढते या विकारास वैद्यकीय परिभाषेत “पुसोरियासिस' असे म्हणतात. यार "वेस्वडेनन" आणि "अर्नीका" ही दोन होमिओपॅथिक औषधे देतात.

 प्रकृतीला उष्ण पडतील, तिखट असतील अशा पदार्थांचे आहारातील प्रमाण शक्य तितके कमी करावे.

 आहारात मिठाचे प्रमाण अत्यल्प असावे.


केसातील तेलकट कोंड्यावर उपचार :

 केसांना तेल लावण्याऐवजी केसांच्या मुळांशी आंबट दही चोळावे व अर्ध्या तासानंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून पिळून. केसांना गुंडाळून वाफारा घ्यावा. असे २/३ वेळा केल्यानंतर रीठा, आवळकाठी व शिकेकाई यांच्या चूर्णाचे समभाग मिश्रण तयार करून १/२ चमचे मिश्रण पाण्यात भिजवून केसांना लावावे. अशा वेळी केस धुण्यासाठी साबून अथवा शांपूचा वापर करू नये. 

 टोमॅटोचा गाळून घेतलेला रस साधारण तासभर डोक्यास लावून ठेवावा. त्यानंतर केस धुवावेत.

 पाणी व शिरका यांचे समभाग मिश्रण तयार करून केसांच्या मुळांना चोळून लावावे.

 कंगवा, ब्रश वगैरे नेहमी जंतुनाशक औषधात धुवून वापरावेत.

 मासिकपाळीचा त्रास असल्यास वेळीच प्रत्यक्ष वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करावेत.

➤ तेलकट, स्निग्धयुक्त पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. अशा आहारामुळे तैलग्रंथी अधिक कार्यप्रवण होऊन त्रास वाढतो.

 आहारात ताजी पिकलेली फळे किंवा त्यांचा रस, हिरव्या पालेभाज्या, दूध, दही यांचे प्रमाण वाढवावे.

 अॅक्युप्रेशर तंत्राची नीट माहिती करून घेऊन आचरणात आणावी.


केसात कोंडा होऊन डोळ्यांची आग :
केसात कोंडा होऊन डोक्यात सतत कंड (खाज) सुटते. केसात खाजवल्याने कोंडा चेहऱ्यावर पडून डोळ्यात जातो. अशावेळी डोळ्यांची आग (जळजळ) होते.
*यासाठी डोळ्यात घालण्यासाठी :

 "नेत्र सुधा" नावाच्या आय ड्रॉप्सचा २/३ थेंब दिवसातून २/३ वेळा वापर करावा.

 डोळ्यांसाठी जीवदया-नेत्रप्रभा वापरावे.

टिप : *डोळ्यात घालण्याचे औषध वापरण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्याशिवाय हा उपचार करू नये.

कोंड्यामुळे त्वचेवर लालसर चट्टे उठल्यास : 

 करवंटीचे लालसर काळपट रंगाचे तेल चट्यावर लावावे. (याचे कपड्यांना डाग पडतात म्हणून काळजी घ्यावी.)

 चेहऱ्यावर लावण्यासाठीच्या फेसपॅकमध्ये "गव्हांकूर तेलाचा" वापर करावा.

 "कैशोर गुग्गुळच्या" २/२ गोळ्या दिवसातून २/३ वेळा पाण्याबरोबर घ्याव्यात.

 केसात कोंडा झाल्याने सतत कंड सुटत असल्यास माक्याचे तेल आठवड्यातून २/३ वेळा रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळाशी चोळून लावावे. सकाळी नहाण करावे.


माक्याचे तेल तयार करण्याची कृती :
१ किली माक्याचे रस, पाव किलो तिळाचे तेल, १० ग्रॅम मण्डुर चूर्ण, १० ग्रॅम त्रिफळा चूर्ण, १० ग्रॅम तुळशीच्या पानांची पावडर एकत्र करून मिश्रण मंदाग्नीवर ठेवावे. या मिश्रणात फक्त तेल शिल्लक राहिल्यावर गाळून केसांना लावण्यासाठी वापरावे. 


केसातील बुरशी
अनेक वेळा केसात बुरशी झाल्याने डोक्यावरील वेगवेगळ्या भागातील केसांचे झुबके निघालेले दिसतात व तेथील त्वचा खपल्या निघाल्यासारखी (Patches) व तुकतुकीत दिसू लागते. विशेषतः मुलांमध्ये हा विकार मोठ्या प्रमाणावर दिसू येतो. याला "पॅचीलेस" (Patchyless) असे म्हणतात. वैद्यकीय परिभाषेत याला "अॅलोपेसिया एरिएटा" (Alopecia Areata) असे म्हणतात. हा विकार एका रात्रीत अचानकपणे उद्भवू शकतो.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post