✏️ अनुक्रमणिका
६. केसांची वाढ होण्यासाठी
७. टक्कल
८. केेेस पिकणे
९. केसांचे नहाण
१०. केसातील उवा लिखा
११. केसातील कोंडा
१२. खवडा
१३. केसात चाई
१४. केसांची अनावश्यक वाढ
१५. काळी मेंदी
१६. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी
१७. केसांसाठी विविध तेले
केसांचे प्रकार
केस साधारणपणे ३ प्रकारांत मोडतात.
(१) कोरडे केस
(२) तेलकट केस
(३) सामान्य किंवा मिश्र केस.
१) कोरडे केस :
केस कोरडे असण्याचे कारण की, डोक्यावरील त्वचेखालील तैलग्रंथी पूर्णपणे कार्यरत नसतात. या 'सिबॅकस ग्रंथी' जेव्हा 'सिबम' हा तैल द्राव पुरेशा प्रमाणात तयार करू शकत नाहीत, तेव्हाच कोरड्या केसांची निर्मिती सुरू होते. कोरडे केस राठ असतात व अशा केसांना सामान्यतः टोकाकडे फाटे फुटलेले असतात. असे केस विंचरताना मोठ्या प्रमाणावर तुटतात. कोरड्या केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्यांत कोंडा होण्याचे प्रमाण अधिक असते.
कोरड्या केसांवर उपचार :
➤ कोरड्या केसांना आठवड्यातून २ वेळा शुध्द खोबरेल तेलाने मसाज करावा. बोटांना तेल लावून केसांच्या मुळाशी गोल गोल फिरवीत थोडा दाब देऊन मसाज करावा.
➤ तेल कोमट करूनच वापरावे.
➤ तेल लावून मसाज करण्यापूर्वी केस स्वच्छ कंगव्याने किंवा ब्रशने साफ विंचरून घ्यावेत.
➤तेल लावून मसाज केल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात भिजवून पाणी पिळून टॉवेल ५ मिनिटे केसांभोवती गुंडाळून ठेवावा. असे साधारणपणे २-३ वेळा तरी करावे. असे करण्याने केसांची रोमरंध्रे मोकळी होऊन तेल केसांच्या मूळांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
➤ अशा केसांसाठी अंड्यांतील बलकाचा हेअर पॅक करावा.
➤ अति उन्हात फिरणे टाळावे.
➤ अशा केसांना डाय, ब्लिच करू नये.
➤ रोज आहारात ३/४ चमचे लोणी किंवा गाईच्या तुपाचा उपयोग करावा.
➤ यीस्टच्या तयार गोळ्या मिळतात त्या रोज घ्याव्यात.
➤ रोज व्हिटॅमिन 'ए' व 'ई' च्या गोळ्या घ्याव्यात. किंवा ही जीवनसत्वे मिळू शकतील असा आहार घ्यावा.
➤ कोरड्या केसांसाठी स्प्रे, जेली यांसारख्या वस्तूंचा वापर करू नये. त्यामुळे केस अधिकच कोरडे होऊ शकतात.
➤ कोरड्या केसांना पॅक करण्यासाठी २/३ अंड्यांतील पिवळा बलक, ३/४ चमचे दही, २/३ चमचे एरंडेल तेल एकत्र चांगले फेसून वापरावे. हेअर पॅक केल्यानंतर अर्ध्या तासाने ते धुवावेत.
➤ कोरड्या केसांना फाटे फुटल्यास किंवा केस तुटत असल्यास माका, त्रिफळा चूर्ण, ब्राम्ही व कोरफडीचा ताजा चिक एकत्र कालवून केसांना हेअर पॅक करावा व अर्ध्या तासानंतर नहावे.
२) तेलकट केस :
ज्यावेळेस डोक्यावरील त्वचेखालील तैलग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात सक्रीय होतात किंवा शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते तेव्हा केस तेलकट दिसू लागतात.
तेलकट केसांवर उपचार :
➤ कडक उन्हात फिरणे कमी करावे. छत्री किंवा टोपी वापरावी.
➤ तेलकट, भाजकट पदार्थ खाणे वर्ज्य करावे.
➤ मुलतानी माती व लिंबाचा रस एकत्र कालवून त्याने हेअर पॅक करून अर्ध्या तासानंतर नहाण करावे.
➤ बेसन (चणा पीठ) व लिंबाचा रस एकत्र कालवून त्याने हेअरपॅक करून अर्ध्या तासानंतर नहाण करावे.
➤ तेलकट केसांना तेल लावताना तेल कोमट करून त्यात लिंबू रस पिळून ते केसांच्या मुळाशी लावावे.
➤ लिंबाचा रस व अननसाचा रस किंवा वाईन यांचे मिश्रण केसांना लावून अर्ध्या तासाने नहाण करावे.
➤तेलकट केस धुण्यासाठीच्या पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून त्याने केस धुवावेत.
➤ केसांना अॅस्ट्रिजंट म्हणून २ भाग काकडी व १ भाग गाजर यांचा रस एकत्र करून लावावा.
➤ केस धुण्यासाठी २ भाग शिकेकाई पावडर व १ भाग लिंबाच्या सुक्या सालींची पावडर थंड पाण्यात कालवून वापरावी.
➤ आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर व लिंबू रस एकत्र करून केसांना हेअर पॅक करावा व अर्ध्या तासानंतर नहाण करावे.
➤ तेलकट केसांना पॅक करण्यासाठी अर्धा कप आवळा पावडर, १ चमचा मेंदी पावडर, २ चमचे दही व २ अंड्यांतील सफेद बलक चांगले एकत्र कालवून त्याचा उपयोग करावा व अर्ध्या तासानंतर नहाण करावे.
➤ केसांना फारच तेलकटपणा जाणवत असल्यास ५० मि.ली. शुध्द खोबरेल तेलात १३ थेंब लव्हेंडर तेल, १२ थेंब बर्ग्यामॉट तेल, २ मि.ली. जोजोबा तेल घालून हालवून चांगले मिश्रण तयार करावे व वापरावे.
३) सामान्य किंवा मिश्र केस
ज्यावेळेस तैलग्रंथींचे कार्य संतुलित प्रमाणात सुरू असते तेव्हा केस चमकदार, सुंदर दिसतात. अशा केसांमुळे त्या व्यक्तीचे स्वास्थ्य चांगले असल्याचे सहज निदर्शनास येते.
सामान्य केसांवर उपचार :
या प्रकारचे केस धुण्यासाठी आवळा पावडर शिकेकाई पावडर, रिठा यांचा वापर करावा.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा.
🙏💐 धन्यवाद 💐🙏