केसगळतीवर उपाय - केसांचे आरोग्य व घरगुती उपाय ♦️ Kesanche Aarogya v Gharguti Uoay

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती

५. केसगळतीवर उपाय             🎯

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

८. केेेस पिकणे

९. केसांचे नहाण

१०. केसातील उवा लिखा

११. केसातील कोंडा

१२. खवडा

१३. केसात चाई

१४. केसांची अनावश्यक वाढ

१५. काळी मेंदी

१६. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१७. केसांसाठी विविध तेले


केसगळतीवर उपचार
'बदामाचे तेल' थोडे गरम करून त्याने केसांच्या मुळांशी हलकासा मसाज करावा.
डाळिंबाच्या पानांचा रस केसांच्या मुळाशी जिरवावा. 
केसांना 'महाभृंगराज तेल' लावावे. पण डोक्यात कोंडा असल्यास हे तेल वापरू नये.
'ऑलिव्ह ऑईल' किंचीत कोमट करून केसांच्या मुळांना हलक्या हाताने चोळावे.
आठवड्यातून २ वेळा केसांना 'निलभृंगादि तेल' लावावे, पण केसात कोंडा असल्यास या तेलाचा वापर करू नये.
केसांना पोषक म्हणून खालील तेल तयार करून वापरावे. 
जटामासी तेल तयार करण्याची कृती :
१०० ग्रॅम जटामासी पावडर तसेच १० ग्रॅम हेअर लाईफ पावडर रात्री अर्धा लिटर पाण्यात भिजत घालावी. सकाळी त्यात पाव लिटर तिळाचे तेल घालून उकळवून हिरवा रंग येईपर्यंत सिध्द करून गाळून घेऊन वापरावे. हे एक उत्तम केशवर्धक तेल म्हणून उपयुक्त होते.
१० ग्रॅम त्रिफळा चूर्ण, २० ग्रॅम माका पावडर, १० ग्रॅम आवळा कूट, १५ ग्रॅम गुंजा फळ, १० ग्रॅम जेष्ठमध, १० ग्रॅम कमलकंद, १० ग्रम मेथी पावडर एकत्र करून त्यातील १ चमचा मिश्रण ३/ ४ पट पाण्यात मिसळून केसांच्या मुळांशी आठवड्यातून २/३ वेळा लावावे. याने केसगळती कमी होण्यास मदत होते व केसांतील कोंड्याचे प्रमाण देखील कमी होते.
"त्रिफळा गुग्गुळच्या" २/२ गोळ्या दिवसातून २ वेळा जेवणापूर्वी घ्याव्यात.
जेवणानंतर "लिव्ह-५२" घ्यावे.
केसांना "त्रिफळादि तेल" आठवड्यातून २ वेळा लावावे.
आहारात केळी, दूध, अंडी, शेवग्याची भाजी यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
अशक्तपणामुळे केस गळती सुरू झाली असल्यास "चायना-क्यू (China - Q)" या होमिओ औषधाचे काही थेंब पाण्यातून दिवसात २ वेळा घ्यावेत.
टायफॉईड सारख्या मुदतीच्या तापामुळे केस गळती सुरू झाली असल्यास 'टायफॉईडिनम २००" (Typhoidinam 200) घ्यावे. 
"एरंडेल तेलाने" केसांच्या मुळाशी हलकासा मसाज करावा.
केसांना लावण्यासाठी "शुध्द खोबरेल तेलाचा वापर करावा.

 आठवड्यातून किमान १/२ वेळा डोक्यावरील त्वचेला अंड्यांतील सफेद बलकाने मसाज करावा.
"गंधक रसायन" १/१ गोळी दिवसातून २ वेळा पाण्याबरोबर घ्यावी. याने केस घट्ट होण्यास मदत होते.
महिन्यातून ४/५ वेळा भिजवलेली मूग डाळ व समभाग मेथीची डाळ एकत्र वाटून डोक्यावर हेअर पॅक करावा. अर्ध्या तासानंतर केस साबण किंवा शांपूने न धूता रिठ्याच्या पाण्याने धुवावेत. 
"शोधन तेल किंवा व्रणशोधन तेल" केसांच्या मुळांना आठवड्यातून किमान २ वेळा तरी लावावे व तासाभरानंतर केस धुवावेत. 
होमिओपॅथीच्या "फॉस्फरस १० एम्." च्या ८ गोळ्या दिवसातून ४ वेळा अशा ३/४ महिने घ्याव्यात.
गुळवेलसत्व, आवळकाठी चूर्ण व नागरमोथा चूर्ण प्रत्येकी २५ ग्रॅम घेऊन एकत्र कालवावे. हे मिश्रण १ चमचा प्रमाणात दिवसातून २ वेळा १ चमचा गाईच्या तूपाबरोबर घ्यावे.
रोज रात्री झोपताना दोन्ही नाकपुड्यांत गाईच्या तुपाचे २/२ थेंब आलटूनपालटून टाकावे. यामुळे केसांची मुळे घट्ट होण्यास मदत होते.
नेहमी एकाच प्रकारचा शाम्पू अथवा साबण वापरावा.
केस धुण्यापूर्वी केसांचा गुंता काढावा. 
केसांना बळकटी येण्यासाठी दररोजच्या हातचाळ्याच्या खाण्यात खजूर व खोबऱ्याचा समावेश करावा.
रोजच्या आहारात दही-ताकाबरोबर किमान १ ग्लास दूध सकाळी किंवा रात्री झोपताना घेत जावे.
दिवसातून किमान ७/८ ग्लास पाणी प्यावे. 
पालकची पाने उकळवून पाणी गाळून घ्यावे. त्यात लिंबाचा रस टाकून केस धुण्यासाठी ते पाणी वापरावे. यामुळे केसातील कोंड्याचा त्रास कमी होऊन केसांचा रखरखीतपणा कमी होतो. 
केस धुण्यासाठी गाजराचा गाळून घेतलेला रस वापरल्यास केस गळती कमी होत जाऊन केसांना मजबुती मिळते.
उन्हाळ्यात केस धुण्यापूर्वी केसांना गाळलेले ताक चोळावे यामुळे डोके थंड राहण्यास मदत होते.
"न्यु क्रॉप" नावाच्या तयार औषधीचा वापर करावा. (हे औषध लावावयास सुरवात केल्यावर सुरवातीस केस जास्त प्रमाणावर गळतात. याची कृपया नोंद घ्यावी.) 
केसांना रात्री तेल लावणे शक्य न झाल्यास आंघोळीपूर्वी तेल लावावे. 
१ चमचा गोक्षुर चूर्ण, १ चमचा ब्राम्ही चूर्ण, १ चमचा मध व अर्धा चमचा गाईचे तूप यांचे मिश्रण रात्री झोपताना केसांच्या मुळाशी चोळून लावावे. सकाळी नहाण करावे. 
मानसिक ताणतणावामुळे केस गळती असल्यास मेमरी अप" या तेलाचा वापर करावा.
आठवड्यातून कमीत कमी एकवेळा तरी केसांना तेल लावणे आवश्यक आहे. हे तेल नुसते केसांना चोपन न लावता त्याची मसाज करावा व नंतर गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो केसाच्या भागाभागामध्ये दाबून धरून वाफ द्यावी.
५० मिली खोबरेल तेलात ५ थेंब जिरॅनियम तेल, १० थेंब चंदन तेल, १० थेंब लव्हेंडर तेल मिळवून मिश्रण चांगले हालवावे. यातील थोडे तेल हातावर घेऊन डोक्यावर बोटांच्या टोकांनी हृदयाच्या बाजूस उतरता मसाज करावा. याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
जास्वंदीच्या फुलांचा रस केसांच्या मुळाशी हळूवारपणे चोळून लावावा व तासाभराने केस धुवावेत. 


जपाकुसुमादि तेल तयार करण्याची कृती :
१ लिटर जास्वंदिच्या फुलांचा रस, १ किलो खोबरेल तेल एकत्र करून मंदाग्नीवर रस आटेपर्यंत ठेवावे. फक्त तेल शिल्लक राहिल्यावर भांडे उतरवून त्यात वाळा, नागरमोथे, तगर, जटामासी यांची प्रत्येकी ५० ग्रॅम पावडर व ५० ग्रॅम पाचेचा पाला घालून सर्व औषधी मुरण्यासाठी तेल एक आठवडा उन्हात ठेवावे. नंतर तेल वस्त्रगाळ करून केसांना लावण्यासाठी वापरावे. 
बकाण्यानिंबाचे (महानिंबाचे) तेल केसांना लावल्यास केस गळती थांबते.


महानिंबाचे तेल तयार करण्याची कृती :
बकाण्यानिंबाच्या पानांचा ठेचून फडक्यात पिळून अंगरस काढावा. त्यात तेवढेच तिळाचे तेल घालावे. त्यात पानांचा चोथा देखील टाकावा. पानांचा रस व तिळाचे तेल यांचे चौपट दह्याची निवळी (सोरट) घालून मिश्रण मंदाग्नीवर कढवून फक्त तेल शिल्लक राहिल्यावर उतरवून थंड झाल्यावर गाळून घेऊन केसांना लावण्यासाठी वापरावे.


माक्याचे तेल तयार करण्याची कृती
लोखंडी कढईत १ लिटर तिळाचे तेल, २ लिटर माक्याचा रस, २ लिटर जास्वंदिच्या फुलांचा अर्क व ४ लिटर गाईचे दूध एक करून तेल सिध्द करून गाळून केसास लावण्यासाठी वापरावे
रोज स्नानाच्या वेळी मेंदीचे उटणे केसास लावावे. 
१०० ग्रॅम तिळाच्या तेलात १० ग्रॅम गंधविरोजा घालून तेलाला उकळी द्यावी. नंतर तेल थंड झाल्यावर गाळून डोक्यावरील त्वचेवर लावावे.
उपलेट (कोष्ट) वाटून केसांना पॅक करावा अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. यामुळे मस्तकास थंडावा मिळतो.
कचोरा वाटून त्याचा उकाळा तयार करून गाळून केसांना लावून अर्ध्या तासानंतर केस धुवावेत.
केसांना नेहमी "वटजटादि तेल" लावावे. 


वटजटादि तेल तयार करण्याची कृती :
पाव किलो वडाच्या पारंब्यांचा वाटलेला गोळा, पाव किलो वाटलेल्या आवळ्याचा गोळा १ लिटर तिळाचे तेल, तेलाएवढेच पाणी व ४ लिटर गाईचे निरसे दूध एकत्र करून मंदाग्नीवर ठेवावे. फक्त तेल शिल्लक राहिल्यावर त्यात सुवासासाठी पाच, मरवा व गव्हलर काचरी पावडर घालून तेल मुरण्यासाठी आठवडाभर उन्हात ठेवावे. त्यानंतर तेल गाळून केसांना लावण्यासाठी उपयोगात आणावे.
केसांना लावण्यासाठी नेहमी "जटामासी तेलाचा" वापर करावा. 

जायपत्री तेल व समभाग खोबरेल तेल यांचे मिश्रण नेहमी केसांना लावण्यासाठी वापरावे.
"षडबिंदू तेलाचे" थेंब नाकात घालावेत.


जपाकुसुमादी तेल तयार करण्याची कृती :
काळ्या तिळाचे तेल २ किलो, माक्याचा रस १ लिटर, आवळ्याचा रस १ लिटर, २०० ग्रॅम लोखंडाचे तुकडे, २०० ग्रॅम नागरमोथा, २०० ग्रॅम बाबची, १०० ग्रॅम त्रिफळा, २० ग्रॅम पानडी, २० ग्रॅम जटामासी, २० ग्रॅम वाळा, १ लिटर जास्वंदीच्या फुलांचा रस, अर्धा लिटर पारस पिंपळाच्या फुलांचा रस व सर्व औषधींच्या ४ पट ताक यांचे मिश्रण करून मंदाग्नीवर ठेवावे. फक्त तेल शिल्लक राहिल्यावर गाळून केसांना नेहमी लावावे. हे तेल लावल्यावर केस शक्यतो थंड पाण्याने धुवावेत. केस धुण्यासाठी साबणाचा वापर करू नये, तसेच आहारात उष्ण पदार्थांचा वापर करू नये.


अमलक्यादी तेल करण्याची कृती :
१ किलो तिळाचे तेल, २ लिटर माक्याचा रस, २ लिटर जास्वंदीचा रस व तेलाच्या ४ पट गाईचे दूध असे मिश्रण मंदाग्नीवर ठेवून तेल सिध्द करून घ्यावे. नंतर त्यात प्रत्येकी ५० ग्रॅम हिराकस, गंध बिरोजाचे खडे, तगर गठोडा व सुवासासाठी पाच, मरवा किंवा दवणा घालून तेल बरणीत दादरा बांधून आठवडाभर उन्हात ठेवावे. नंतर गाळून वापरावे.
आरोग्यवर्धिनीच्या ३/३ गोळ्या सकाळी व सायंकाळी घ्याव्यात.
 शक्य असल्यास नियमितपणे १/२ मिनिटे शिर्षासन करावे.
"रसायन चूर्ण" रोज सकाळ-संध्याकाळ १/१ चमचा प्रमाणात गरम पाण्याबरोबर घ्यावे. (रसायन चूर्ण - गुळवेल, गोखरू व आवळकाठी यांचे समभाग मिश्रण.)
केशवर्धक म्हणून आहारात दूध, तूप, कडधान्ये, गाजर, बीट, काकडी, खजूर, आवळा, कोहळा, जर्दाळू, मनुका इत्यादींचा समावेश असावा.
हेअर कंडीशनर म्हणून केसांना कोरफडीचा गर आठवड्यातून एकदोन वेळा लावण्याने केस मोकळे व मऊ राहतात.
हेअर कंडीशनर म्हणून केसांना निरसे दूध लावावे.
आंबट दही, खवलेल्या नासक्या नारळाचे दूध व कोरफडीचा गर यांचे मिश्रण हे उत्तम घरगुती हेअर कंडीशनर म्हणून वापरता येण्यासारखे आहे.
तिळाचे तेल व एरंडेल तेल समभाग एकत्र करून केसांना लावण्यासाठी वापरावे.
कढीपत्ता बारीक वाटून खोबरेल तेलात कालवून ते तेल मंदाग्नीवर चांगले उकळवून घ्यावे. थंड झाल्यावर तेल फडक्याने गाळून केसांना लावण्यासाठी वापरावे.
ब्राम्ही, माका, आवळा, अश्वगंधा, संत्रासाल, अर्जुन सादडा यांचे समभाग चूर्ण पाण्यात कालवून केसांच्या मुळाशी लावावे. तासाभराने केस शिकेकाई पावडरने धुवावेत.
जास्वंदीची फुले, त्रिफळा, अश्वगंधा, अर्जुन सादडा व तुळस यांचे समभाग मिश्रण पाण्यात कालवून केसांच्या मुळाशी लावावे. तासाभराने रिठ्याच्या पाण्याने केस धुवावेत.
आहारात पापड, लोणची, आंबट, खारट पदार्थांचा हात राखून वापर करावा.
दीर्घ मुदतीच्या तापामुळे केस गळती सुरू झाली असल्यास "लघुमालिनी वसंत" या २/२ गोळ्या सकाळ-संध्याकाळी लोणी व साखरेबरोबर घ्याव्यात.
जास्वंदीच्या फुलांचे चूर्ण १ चमचा, कचूर सुगंधी चूर्ण १ चमचा, ब्राम्ही चूर्ण १ चमचा यांचे ८ चमचे *कोरफडीच्या चिकात मिश्रण तयार करून त्यात "मोतीया रोशा तेलाचे" ५ थेंब टाकून हे पातळसर मिश्रण केसांच्या मुळाशी लावावे. अर्ध्या तासानंतर केस धुवावे. आठवड्यातून २ वेळा, असा कमीतकमी ३ महिने हा उपचार करावा.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post