केसातील उवा लिखा - केसांचे आरोग्य व घरगुती उपाय ♦️ Kesatil Uva Likha 🔥 Uva Pratibandhak Upay

✏️ अनुक्रमणिका

१. केसांचे सर्वसाधारण आरोग्य

२. केसांचे प्रकार

३. केसांची सामान्य चिकित्सा

४. केस गळती

५. केसगळतीवर उपाय

६. केसांची वाढ होण्यासाठी

७. टक्कल

. केेेस पिकणे

. केसांसाठी कलप

०. केसांचे नहाण

११. केसातील उवा लिखा

१२. केसातील कोंडा

१३. खवडा

१४. केसात चाई

१५. केसांची अनावश्यक वाढ

१६. काळी मेंदी

१७. प्रवासात घ्यावयाची केसांची काळजी

१८. केसांसाठी विविध तेले


केसातील उवा-लिखा
केसातील ऊवा-लिखांची समस्या ही स्त्रियांची कायमची डोकेदुखी आहे. त्यावर अनेक स्त्रिया अनेक प्रकारचे उपाय करताना आढळतात पण यातून कोणाही स्त्रीची कायम सुटका झालेली नाही व होणे देखील शक्य नाही. यावर सतत उवानाशक औषधे वापरल्याने केसांची हानी होतेच पण केसाखालील त्वचा, मानेच्या व कपाळाच्या भागावर लालसर पुरळ उठते. डोक्यातील उवांमुळे व प्रतिबंधात्मक उपायांमुळे केसात सतत कंड येत राहते. अशावेळी खाजवल्याने डोक्यात खटे, जखमा होतात. परिणामी केसगळती सुरू होऊ शकते.

कारणे :
केसांची अस्वच्छता.

 सतत उवा झालेल्या स्त्रियांच्या संपर्कात असणे.
दुसऱ्याचा कंगवा, फणी, केस पुसण्याचा टॉवेल वगैरे वापरणे.

 मोठे आजारपण.

 केसातील गुंता.


काही घ्यावयाची काळजी :

 केसांना उवाप्रतिबंधक असे कोणतेही औषध लावताना त्याचा हात देखील डोळ्यांना तसेच मानेला, गळ्याला किंवा चेहऱ्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी.

 जेवणाखाणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. कारण प्रत्येक उवाप्रतिबंधक औषधात विषारी औषधांचा समावेश असतोच.

 लहान मुले व मुलींसाठी शक्यतो या औषधांचा वापर करू नये, कारण त्यांना एकतर समज नसते व त्यांच्या डोक्यावरील त्वचा नाजूक असते.

 उवा प्रतिबंधक औषध रात्री झोपताना केसांना लावावे व केस सफेद फडक्याने गुंडाळावेत.

 सकाळी प्रथम एखाद्या आयुर्वेदिक शांपूने अथवा रिठा पावडर वापरून केस धुवावेत. केस साधारण दमट असताना प्रथम मोठ्या दात्यांच्या कंगव्याने व नंतर फणीने विंचरावेत. त्यामुळे केसातील मेलेल्या उवा-लिखा निघून जातील.

 शक्य असेल त्यांनी नहाणानंतर तासाभराने कोरफडीचा ताजा गर केसांच्या मुळाशी चोळावा व केस मोठ्या दात्याच्या कंगव्याने विंचरावेत. तासाभरानंतर केस धुवावेत.


उवा प्रतिबंधक उपाय :

 १ चमचा तुळशीच्या पानांची पावडर, १ चमचा बावची पावडर, १ चमचा सीताफळीच्या बियाची पावडर, १ चमचा कचूर सुगंधी यांचे मिश्रण तयार करून ८ चमचे कोरफडीच्या ताज्या गरात कालवून त्यात मोतिया रोशा तेलाचे ५ थेंब टाकावेत. हे पातळसर मिश्रण तयार करून हाताच्या बोटांनी केसांच्या मुळाशी लावावे. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. आठवड्यातून २ वेळा असा महिनाभर सातत्याने हा उपाय करावा.

 १०० मिलीग्रॅम खोबरेल तेलात, ३० ते ३५ थेंब रोझमेरी तेल, १५ थेंब निलगिरी तेल, १५ थेंब जिरेनियम तेल, ३० ते ३२ थेंब लव्हेंडर तेल घालून चांगले मिश्रण तयार करून आवश्यक तेवढे तेल केसांच्या मुळांपासून अगदी केसांच्या टोकापर्यंत चोळावे. केस किमान दोन तास फडक्याने बांधून ठेवून नंतर नहाण करावे. नहाणासाठी सुचविलेल्या औषधींचा वापर केल्यास वेगळ्या शांपू किंवा साबनची आवश्यकता भासणार नाही. तीन /चार दिवसानंतर केसांसाठी परत या मिश्रणाचा वापर करावा.

 १०० मि.ग्रॅ. खोबरेल तेलात १० ग्रॅम कापूर खलून हे तेल आठवड्यातून १/२ वेळा झोपताना केसांना लावावे. सकाळी केस रिठ्याच्या पाण्याने धुवावेत.

 आठवड्यातून २ वेळा लिंबू व आल्याचा समभाग गाळून घेतलेला रस एकत्र करून केसांना लावावा. सकाळी केस धुवावेत. 

 दही व कांद्याचा समभाग रस यांचे मिश्रण केसांना लावावे. केस सुकण्यापूर्वीच धुवावेत.

 शिकेकाई किंवा कोणतेही औषध केसांना लावण्यापूर्वी केस एकदा मीठपाण्याने धुवावेत.

 बाजारात तयार मिळणारे "पुष्कराज तेल" रात्री केसांना लावावे व सकाळी नहाण करावे.

 सीताफळीच्या बियांची पावडर किंवा कच्च्या सुकविलेल्या सीताफळाची पावडर वस्त्रगाळ करून झोपताना केसांना चोळावी. डोक्यास सफेद फडके बांधून झोपावे. सकाळी रीठ्याच्या पाण्याने केस धुवावेत. पावडर लावताना डोळ्यांवर फडके धरावे न पेक्षा पावडर डोळ्यांत जाऊन अपाय होऊ शकतो. लहान मुलींसाठी ही पावडर वापरू नये. वापरलीच तर त्यांनी डोके त्यांचे हात फडक्याने बांधून ठेवावेत. खाजवू नये म्हणून त्यांचे हात फडक्याने बांधून ठेवावेत.

 पोटात घेण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने "आरोग्यवर्धिनी वटी" व "रसायन चूर्णाचा" वापर करावा.

 रात्री झोपताना केसांना कांद्याचा रस चोळावा व डोक्याला सफेद फडके बांधून झोपावे. सकाळी रिठ्याच्या पाण्याने स्वच्छ नहाण करावे. याने केसांचा कांद्याचा उग्र वास देखील दूर होतो. 

 रात्री झोपताना पाण्यात वाटलेल्या बावच्या केसांच्या मुळाशी व केसांवर चोळून लावाव्यात व केस सफेद सुती - कापडाने बांधून ठेवावेत. बावचीच्या दर्र्पाणे उवा व लिखा मरतात. सकाळी रिठ्याच्या पाण्याने स्नान करावे व केस फणीने विंचरून साफ करावेत.

 याच लेखात केसवर्धनासाठी सांगितलेले महानिंबाचे तेल (बकाण्यानिंबाचे तेल) वापरावे.

 इंद्रावणीचे मूळ गोमूत्रात वाटून लेप करावा.

 कोष्ट (उपलेट) वाटून रात्री केसांना लेप करावा.

 डोक्यावरील केसांची नीट निगा न राखल्यास केसांच्या मुळांशी त्वचेलगत उवा-लिखा भरपूर प्रमाणात होतात.

➤ उवा झालेल्याच्या शेजारी दुसरा मनुष्य झोपला तरी त्याच्याही डोक्यात (केसात) उवा प्रवेश करतात.

 उवा-लिखा झाल्याने डोक्यात सतत खाज सुटते. 

 शिपीचंद खोबरेल तेलात खलून ते तेल रात्री झोपताना डोक्याला चोळून लावावे. सकाळी शिकेकाईने डोके धुवावे.

 सीताफळीच्या बिया गोमूत्रात वाटून तो लगदा केसांच्या मुळाशी रात्री चोळून लावावा व डोक्यास सफेद फडके बांधून झोपावे. सकाळी केस धुण्यासाठी शिकेकाई किंवा रिठ्याचा उपयोग करावा.

 ५० मिली करंज तेलात ५ ग्रॅम शुध्द कापूर खलून ते तेल रात्री झोपण्यापूर्वी केसाना लावावे. केस सफेद सुती कपड्याने बांधावेत. सकाळी रिठ्याच्या पाण्याने केस धुवावेत.

 "लायसेजीन" हे औषध रात्री झोपताना केसांना लावावे. सकाळी नहाण करावे.

समभाग सीताफळीच्या पानांचा रस व पेरूच्या पानांचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून रात्री झोपताना केसांना चोळून लावावा. सकाळी केस धुवावेत.



आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असेल हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका. कृपया कोणतेही उपाय करण्याआधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वैधानिक सूचना नक्कीच वाचा. 

🙏💐 धन्यवाद 💐🙏

Post a Comment (0)
Previous Post Next Post