सरली निशा हसली उषा
सरली निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा
देणगी मिळाली मानवा
उधारण्या तारण्या जन्मला भिवा ।।धृ।।
धन्य ती माता भिमाई
पोटी आला रामजीचा लाल
14 एप्रिल या दिनी
समतेचा झाला उशकाल
रखरखत्या उन्हामध्ये
91 सणामध्ये
चैता मध्ये गारवा
उधारण्या तारण्या जन्मला भिवा ।।१।।
भारत भूमिचा सुपुत्र
जन्मला या मंगल दिनी
फुलोरा फुलुनी आला
दलितांच्या घरी अंगणी
निळ्या नभी निळा नवा
लाखा मध्ये एक दिवा
शितल जनु चांदवा
उधारण्या तारण्या जन्मला भिवा ।।२।।
महू गाव सारे नाचले
उधळीत सप्तरंग
हर्षाने झाले
दुबळ्यांचे अंतरंग
धन्य धन्य हा जन्म
सार्थक हे दीपशाम
जीवा लागे या गोडवा
उधारण्या तारण्या जन्मला भिवा ।।३।।
सरली निशा हसली उषा
आनंदल्या दाही दिशा
देणगी मिळाली मानवा
उधारण्या तारण्या जन्मला भिवा