भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले
त्रिसरण पंचशीलाचे सुर जुळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।।धृ।।
दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश
दीनदुबळ्यांचा केला विकास
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।।१।।
जीर्ण रुढीच्या जीर्ण चालीरीती
नष्ट केल्या देऊन मुठ माती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।।२।।
साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग
बुद्ध धम्मात होताची दंग
मानवाला जीवनाचे महत्व कळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।।३।।
निर्जीवात या टाकीला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।।४।।
त्रिसरण पंचशीलाचे सुर जुळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले