थांबा हो थांबा, गाडीवाले दादा आहे
थांबा हो थांबा, गाडीवाले दादा आहे
एकटा मी भिम माझे नाव
राहिले दुरवरी माझे गाव,
गाडीत घ्या हो मला, मला ss
गाडीत घ्या हो मला ।।धृ।।
पाठीवर आहे दफ्तराचे ओझे
तापत्या उन्हाने जळती पाय माझे
हा भयाण वारा तन माझे भाजे
घाम थेंब गळती लय ताजे ताजे
येऊ द्या दया हो मज पामराची
घ्या मला, घ्या मला, घ्या मला
गाडीत घ्या हो मला...।।१।।
गाडीवान बोले जात सांग बाळा
दिसतो खरोखर लय साधा भोळा
भीमबाळ बोले महार मी वेडा
गाडीवान बोले धांव बाळ थोडा
बाटेल गाडी वाटेल मी तर
कसं मी घेऊ रे मी तुला
गाडीत घ्या हो मला ...।।२।।
उपकार तुमचे विसरणार नाही
देतो तुम्हाला इमानाची ग्वाही
सांगणार नाही कुणाला मी काही
झाला जीव माझा लय ल्हाही ल्हाही
वामन माझी फार वाट पाही
बसुनी घ्या मला घ्या मला
गाडीत घ्या हो मला...।।३।।
थांबा हो थांबा गाडीवाले दादा
आहे एकटा मी भिम माझे नाव
राहिले दूरवरी माझे गाव
गाडीत घ्या हो मला, मला
गाडीत घ्या हो मला...।।४।।