ग रमा, धन्य तू
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी
देइ स्पूर्ति उभी राहुनी पाठी...(२) ।।धृ।।
शेण उपसायची, गौऱ्या थापायची
कधी उपाशी तर कधी शिळी पाती
फाटक्या लुघड्याच्या बंधीयल्या ग गाठी
ग रमा, धन्य तू जन्मली बा भीमा साठी... ।।१।।
भार वाहिले, दुःख साहिले
तरी भीमा ला तू कधी ना दुखविले
असता परदेशी भीम शिक्षणासाठी
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी... ।।२।।
करावी चिंता ना कधी, तुम्ही माझी
शिकाव खुप तुम्ही, अहो साहेब आधी
मुक्त करण्या सामाज हा नवकोटि...
ग रमा धन्य तू जन्मली बा भीमा साठी... ।।३।।
देइ स्पूर्ति उभी राहुनी पाठी
ग रमा धन्य तू...