अशी कमाल केली रं दादा
होत ओसडलेलं रान
कसं बहरून छान
भिमाची करणी बोले ही धरणी
जयभीम सन्मानानं...२
अशी कमाल केली रं दादा
भिमाई च्या पोरानं ।।धृ।।
काल शिकायची होती बंदी
दिली भिमान नामी संधी
आज शिकायला पोरं पोरी
कसे जाती विदेशामंधी
राहायला माळी फिरायला गाडी
हाती मोबाईल फोन ...२
अशी कमाल केली रं दादा ।।१।।
काल फाटकच लुगडं चोळी
माय घालायची रोज रोज
आज शालू पैठणी नेसून
कश्या करतात शिंगार साज
भिमाच देणं घालून सोनं
फिरतात आलिशान ...२
अशी कमाल केली रं दादा ।।२।।
काल लिहून ठेवलाय कायदा
आज साऱ्यांचा झालाय फायदा
पाहीन समाज सुटा बुटात
होता भीमान केलाय वायदा
असा कुणाचा जगात गौरव
केला का इतिहासानं ...२
अशी कमाल केली रं दादा ।।३।।