मला बाई राती
मला बाई राती सपान पडलं
भारतरत्न भीमाच.
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
जणू काय इंग्लंड जर्मन चा राजा
तसाच भीमराव दिसतोय माझा
पायात बूट हाय
डोक्यात हॅट हाय
युरोपियन दिसते सुटात
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
रथाच्या भोवती जमलाय तांडा
रथाला लावलाय निळाच झेंडा
निळे निळे लोक हाय
त्यात भीम एक हाय
कोट्यावधी गणगोतात
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
फुलांनी सजलाय चांदीचा रथ
चमचम करतोय वरुनी छत
चांदीचा रथ हाय
त्याला पण छत हाय
रथ हा शंकर लाखात
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात.
मला बाई राती सपान पडलं
भारतरत्न भीमाच.
संविधानाच पुस्तक हातात
भीमराव बसलाय रथात