गौतमा तूच माझ्या गुरूचा गुरु
या मंगल प्रसंगी तुजला स्मरू
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु
कार्य महान आहे तुझे
जगाने गुरु माणिले पाहिजे
जो ना मनिल तो समझा आहे माथे फिरू
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु
तुझे मोठे पण अंतरी जाणिले
म्हणून माझ्या गुरुने गुरु माणिले
का न आधी रे तुझी मी पुजा करू
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु
तत्व प्रणाली तुमची या हृदयाशी
धम्म अनुयायी झालो स्वताच्या खुशी
तव चरणी आता तरू वा मरु
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु
तुझा सेवक रामेशा जगतामधी
तव नामाचे भांडवल नकरूणी कधी
नाही झाला अजुनी तो पोट भरू
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु
या मंगल प्रसंगी तुजला स्मरू
गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरु