भाजणीची चकली रेसिपी
वेळ: ३५ मिनीटे (भाजणी तयार असल्यास)
नग: साधारण २० ते २२ मध्यम चकल्या
🎯 साहित्य :
- १ कप चकलीची भाजणी
चकलीची भाजणी रेसिपी
वाढणी : साधारण एक किलो
साहित्य:
- दिड कप चणाडाळ
- १/२ कप उडीदडाळ
- १/२ कप मूगडाळ
- २ कप तांदूळ
- १/४ कप साबुदाणा
- ५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
- मूठभर धणे
कृती:
१) सर्व डाळी वेगवेगळया धुवून घ्याव्यात. वेगवेगळया सुती कपड्यावर सावलीत वाळत घालाव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी ब्राऊनिश रंग येईस्तोवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.
टीप :
१) चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
२) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.
- १ कप पाणी
- १ टिस्पून हिंग
- २ टिस्पून पांढरे तिळ
- १/२ चमचा ओवा
- १ टेस्पून लाल तिखट
- १ टिस्पून तेल
- चवीपुरते मीठ
🎯 कृती
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सोर्याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.
रव्याची चकली रेसिपी
- एक वाटी बारीक रवा
- दोन वाटी तांदळाचे पीठ
- चार चमचे तूप
- हळद
- धणे जिरे पावडर
- पांढरे तीळ
- ओवा
- दोन चमचे लाल तिखट
- हिंग
- तेल
मूगाच्या डाळीची चकली रेसिपी
- दोन वाटी मूगडाळ
- एक वाटी मैदा
- एक चमचा पांढरे तीळ
- एक चमचा ओवा
- एक चमचा जिरे
- दोन चमचे लाल तिखट
- चवीपुरते मीठ
- तेल
गव्हाच्या पिठाची चकली रेसिपी
🎯 साहित्य
- एक वाटी कणीक
- एक चमचा धण्याची पूड
- एक चमचा जिऱ्याची पूड
- एक चमचा लाल तिखट
- चवीपुरतं मीठ
- हिंग
- हळद
- थोडा ओवा
- तेल
बटाटा साबुदाणा चकली रेसिपी
🎯 साहित्य
- एक वाटी साबुदाणा
- चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे
- चार पाच हिरव्या मिरच्या
- जिरे
- चवीप्रमाणे मीठ
🎯 कृती
- साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवा
- सकाळी बटाटे उकडून घ्या
- साबुदाणा उकडीच्या भांड्यात पारदर्शक होईपर्यंत वाफवून घ्या
- बटाटे सोलून स्मॅश करा, त्यात जिरे आणि हिरवी मिरची वाटून टाका
- साबुदाणा मिसळून पीठ मळून घ्या
- चकलीच्या साच्यात पीठ घाला आणि चकली पाडा.
- या चकला उन्हात चार ते पाच दिवस सुकवा
- वाळल्यानंतर डब्यात भरून ठेवाट
- उपवासाच्या दिवशी मस्त गरम तेलात तळून कुरकुरीत चकलीचा फराळ खा.
तांदळाच्या पिठाची चकली रेसिपी
🎯 साहित्य
- दोन वाटी तांदळाचे पीठ
- दोन वाटी मैदा
- अर्धी वाटी तूप
- चवीपुरते मीठ
- हळद
- दोन चमचे लाल तिखट
- दोन चमचे धणे जिरे पूड
- दहा लसूण पाकळ्या
- चिमूटभर सोडा
🎯 कृती
- तांदळाचे पीठ, मैदा एकत्र करा त्यात लाल तिखट,धणे जिरे पूड, मीठ, हळद आणि वाटलेली लसूण पेस्ट मिसळा.
- तूप गरम करून कडकडीत तूपाचे मोहन टाका.
- तूपात पीठ फेसून चांगले मळून घ्या.
- एक ते दीड तासाने चकल्या पाडा
- मंद गॅसवर तळून घ्या.