तीळांचे फायदे खालीलप्रमाणे आहेत :
१. प्रोटिन्सचा स्रोत
तीळाच्या बिया प्रथिनेंचा चांगला स्रोत आहे. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका निभावते. प्रथिण्यांमुळे हाड, दात, स्नायु, ऊती निरोगी राहतात. वजन संतुलित राहते.
२. डायबेटिस व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तदाब (ब्लडप्रेशर) कमी करतो.
तीळामध्ये मॅग्नेशियम असते ज्याच्यामुळे टाईप-२ डायबिटीस कमी होते. तिळ खाल्ल्यामुळे रक्तातील इन्सुलिन व ग्लुकोजचे स्तर नियंत्रित राहते. रक्ताचा दबाव कमी करतो. हायपरटेन्शनची समस्या दूर होते. तीळामध्ये पिनारेसिनोल असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
३. निरोगी हृदय
तीळ खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तीळामध्ये सेसामीन आणि सेसामोलिन असल्यामुळे मानव शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड कमी होते जे हृदयविकाराला कारणीभूत असतात.
४. कॅन्सर होऊ देत नाही.
तीळामध्ये खूप जीवनसत्व आणि खनिजपदार्थ असल्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ देत नाही आणि कॅन्सरचा प्रभाव कमी होतो. तीळामध्ये फायटेट देखील असते, हे खूप दुर्मिळ परंतु शक्तिशाली आहे, हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. हे शरीरातील फ्री रॅडीकल्स चे प्रमाण कमी करते. शरीरात जास्त प्रमाणात फ्री रॅडीकल्स असले तर रक्ताचा कर्करोग, आतड्यांच्या कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी करतो आणि सोबतच अँटीएजिंग सुद्धा आहे.
५. पचन आणि चयापचय शक्ती वाढते.
तीळामध्ये फाइबरचे प्रमाण जास्त आहे. फायबरमुळे शरीरातील कचऱ्याचं व्यवस्थापन बरोबर होते सोबतच लहान आतडे आणि मोठे आतडे यांचं आरोग्य चांगलं राहतं.
६. संधिवात
तीळामध्ये कॉपर म्हणजे तांबे असते ज्याच्यामुळे शरीरातील सांध्यांवरील सूज व त्यांच्या वेदना कमी होतात. कॉपर हे रक्तवाहिन्यांना, हाडांना, सांध्यांना मजबुती आणि शक्ती देते.
७. हाडांचे आरोग्य
तीळ हे कॅलसीअम, झिंक, कॉपर, मँगॅनीज, फॉस्फरस यांचा चांगला स्रोत आहे. तीळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात.
८. ओरल हेल्थ म्हणजे तोंडी आरोग्य
थोडंसं तीळाच्या तेलाचा गुरला केल्याने किंवा तीळ बारीक चावून खाल्ल्याने तोंडातील सगळे सूक्ष्मजंतू मरतात, हिरड्यांची जळजळ कमी होते, दात साफ, मजबूत आणि पांढरे होतात.
९. तीळामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन E यांचे प्रमाण अधिक आहेत.
१०. केसांचे आरोग्य
तीळांमध्ये ओमेगा-३, ओमेगा-६, ओमेगा-९, झिंक, आयरण, सेलेनिअम असल्यामुळे केस निरोगी राहतात. तीळाच्या तेलाने डोक्याची मालिश केल्याने केसगळती, पांढरे केस, कोंडा, भुरे केस यांची समस्या कमी होते. स्कॅल्प संबंधित समस्या सुद्धा दूर होतात. केस काळे आणि मजबूत राहतात.
११. त्वचेचे आरोग्य
तीळाचे तेल त्वचेला लावल्याने त्वचेचं तेज, लवचिकता, मऊपणा वाढतो. त्वचेतील ओलावा कायम राहतो. जर त्वचेला इजा झाली असेल किंवा खरचटूण असेल तर तीळाचे तेल ते बरं करू शकते. तीळाच्या तेलाला दररोज लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, रंगद्रव्य आणि डागांचे प्रमाण कमी होते. पायांच्या भेगांवर सुद्धा तीळाचे तेल उपायकारक आहे. त्वचेला सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण करतो. तीळांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीअजिंग गुणधर्म आहेत.