दिवाळी सण का साजरा केला जातो ? Why Diwali is Celebrated in Marathi


भारत हा अनेक विविधतेने नटलेला देश आहे. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, विविध प्रकारचे अन्न आहे, वेगवेगळे सण व उत्सव , वेगवेगळे धर्म, इत्यादी. 
दिवाळी हा एक सण आहे जो भारत देशात साजरा केला जातो. दिवाळीला "दिव्यांचा सण" असे सुद्धा म्हणतात. दिवाळी साजरी करण्यामागे काही कथा/गोष्टी आहे जे आपण आज जाणुन घेणार आहोत, परंतु कथा कोणतीही असो लोकं आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावतात.


१. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान राम १४ वर्षांचा वनवास करून अयोध्येत परत आले, त्यामुळे त्यादिवशी संपूर्ण अयोध्याती रहिवासी खूपच आनंदित झाले, त्यामुळे त्या दिवशी लोकांनी पानाफुलाचे तोरण घराला बांधले, सुंदर व मनमोहक रांगोळ्या आपल्या घरापुढे काढल्या. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.


२. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, द्वापर युगात, भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाने, सध्याच्या आसामजवळील प्राग्ज्योतिषपुराचा दुष्ट राजा नरकासुर या राक्षसाचा वध केला, ज्याने १६,००० मुलींना कैदेत ठेवले होते. उत्तर भारतातील ब्रज प्रदेशात, आसामचा काही भाग, तसेच दक्षिणेकडील तमिळ आणि तेलगू समुदायांमध्ये, नरक चतुर्दशी हा दिवस म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला.

३. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा देव आणि राक्षस समुद्रमंथन करत होते तेव्हा देवी लक्ष्मी यांचा जन्म झाला. म्हणून या दिवसाला दिवाळी म्हणून साजरी करतात. याच दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे लग्न झाले. देवी लक्ष्मीला दान आणि समृद्धीची देवी म्हणून संबोधले जाते.

४. माता लक्ष्मीला असुर राजा बाली ने कैद केले आणि माता लक्ष्मीला राजा बालीच्या तुरुंगातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी पाचवा अवतार घेतला, जो भगवान विष्णूचा वामन अवतार असल्याचे म्हटले जाते. वामन यांनीच कार्तिक अमावस्येला राजा बालीच्या बंदीवासातून माता लक्ष्मीची सुटका केली आणि म्हणूनच दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

४. महाभारत या हिंदू पौराणिक कथेनुसार, शकुनी मामाच्या युक्तीच्या मदतीने कौरवांनी बुद्धिबळाच्या खेळात पांडवांचा पराभव केला, परिणामी पांडवांना १३ वर्षे जंगलात जावे लागले. कार्तिक महिन्यातील अमावास्येला पाच पांडव आपला वनवास संपवून आपल्या राज्यात "हस्तिनापूर" परतले असे म्हणतात. त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यातील जनतेने दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले.

५. सिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंह यांना मुघल बादशाह जहांगीर यांनी कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून सिख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.

६. जैन धर्माच्या लोकांच्या मते, कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला महावीरांना मोक्ष प्राप्त झाली. आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.

७. बंगाली समाज : राक्षसांची वाढती दहशत पाहून माता शक्तीने राक्षसांना मारण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले आणि राक्षसांचा नाश करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भगवान शिव खाली जाऊन त्यांच्यासमोर आडवे झाले आणि भगवान शिवाच्या अंगाला स्पर्श झाल्याने माता महाकालीचा राग शांत झाला आणि म्हणूनच माता लक्ष्मीची पूजा करून दिवाळीचा सण शांतपणे साजरा केला जातो. दिवाळीच्या या रात्री माता शक्तीचे उग्र रूप असलेल्या कालीचीही पूजा केली जाते..दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पौर्णिमेलाच झालेले असते.

८. बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.

९. दिवाळी हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा सण आहे. कारण दिवाळीचा सण त्याच वेळी येतो जेव्हा खरीपाचे पीक परीपक्व होऊन त्याची काढणी करण्याची वेळ येते. शेतकरी हा सण आपल्या समृद्धीचे लक्षण मानतात आणि म्हणूनच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

१०. भारतीय आर्य समाजाच्या मान्यतेनुसार, १९व्या शतकातील महर्षी दयानंद जी यांनी भारतीय इतिहासात दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्त केले. स्वामी दयानंदजींनी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि दयानंदजींनी बंधुता आणि मानवतेला प्रोत्साहन दिले होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आर्य समाजातील लोकांसाठी दिवाळीचा हा दिवस खूप खास आहे.


दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.

दिवाळीचे पाच दिवस


१. धनत्रयोदशी

दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो.

देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना केली जाते. बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.

२. नरक चतुर्दशी

हा दिवस छोटी दिवाळी म्हणूनही ओळखला जातो, नरक चतुर्दशी या पाच दिवसांच्या उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पडतो. या दिवशी लोक घरे स्वच्छ करतात, रंगांनी घर सजवतात आणि महिला मेहंदी देखील लावतात. या दिवसापासून लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागतात. या दिवशी लोक त्यांच्या खाससाठी भेटवस्तू खरेदी करण्यास प्रारंभ करतात आणि त्यांना भेट देऊन आनंदित करतात.

३. लक्ष्मीपूजन

पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरीती रिवाजात माता लक्ष्मी श्री गणेश भगवान आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते.

या देविदेवताना आमंत्रित केले जाते. घरात नेहमीसाठी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या आणि बाल्कन्या खुले ठेवले जातात.तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.

पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

४. पाडवा

दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.
या दिवशी विवाहित दाम्पत्ती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. ग्रामीण भागात घरातील पशूंना विशेषतः गाई बैल आणि म्हशी व बकरी सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात.

५. भाऊबीज

दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात.

भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतात. व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो.

हा दिवस भाऊ बहिण सोबत राहून साजरा करतात विवाहित बहिणी माहेरी येतात. भारतात हा दिवस काही राज्यांमध्ये “टीका” या नावाने ओळखला जातो.


Post a Comment (0)
Previous Post Next Post