बुद्धाला वंदना गाऊया.....
हो हो हो- (३ वेळा) ।।धृ।।
बुद्ध पहाट ही झाली
पक्षी कणी जागी झाले
राणीवणी जागोजागी
त्याचि किलबिल चाले... (२)
करू अंतरंग खुले
भाव सुगंधी ही फुले
चरणी बुद्धाच्या वाहूया....
बुद्धाला वंदना गाऊया... ।।१।।
बुद्ध विहारात जाता
शांती लाभत असे मला
मग्न होता चिंतनात
येते बुद्धाला करुणा... (२)
जगभर त्याची कीर्ती
तीच मांगल्याची मूर्ती
डोळं भरून पाहूया....
बुद्धाला वंदना गाऊया...।।२।।
माणसाला विचलित
करी मोह माया क्रोध
त्याचा लाऊनिय शोध धमान जीव
केला राजानंदा बोध... (२)
करू त्याचे आचरण
सुखी समाधानाने राहूया....
बुद्धाला वंदना गाऊया.. ।।३।।
बुद्ध विहिरी जाऊया
बुद्धाला वंदना गाऊया....