शिकला हो माझा भिवा
शिकला हो माझा भिवा
उपवाशी राहुनी गरीबीती साहूनी
तेलाचा लावूनी दिवा..
शिकला हो माझा...।।धृ।।
खूप शिकावे ठरविले मनाने
परंतु रुढीच्या रूढी बंधनाने
जाळिले त्याच्या जिवा...
शिकला हो माझा... ।।१।।
माझ्या भीमाने विद्याधन करावे
ज्ञान सागराला प्राशन करावे
पाहण्या नव्या वैभवा
शिकला हो माझा... ।।२।।
शाळेच्या बाहेर भीमाने बसावे
सवर्ण मुलांनी बघुनी हसावे
घेऊनी अशा अनुभवा
शिकला हो माझा... ।।३।।
अमानुष रुढीच्या विषमतेची
या देशातील जातीयतेची
पचवून विषारी दवा
शिकला हो माझा भिवा...।।४।।