जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
जीवाला जीवाचं दान दिले भीमाने
माणसाला माणूसपण दिले प्रेमाने ।।धृ।।
माणसाला माणसाची सात मुळी नव्हती
दृष्ट रूढी माणसाला छळीतच होती
समतेचा मळा फुलविला जोमाने
माणसाला माणूसपण... ।।१।।
विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला
माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला
मनुस्मृतीचे बीज पेरले मनाने
माणसाला माणूसपण... ।।२।।
गरीबाच्या घरामध्ये जन्म त्याने घेऊनी
प्रभाकरा फितीच्या जागी गेला तो घेऊनी
शिकविली शिकवण क्रमाक्रमाने
माणसाला माणूसपण... ।।३।।