झाला नसता भीम
झाला नसता भीम तर झाला नसता आंबेडकर
समानतेची शिखरे सारी चढला नसता आंबेडकर ।।धृ।।
आला नसता भीम तर ठाई ठाई जाऊनी
अस्पृश्यता ही पाहून सारी रडला नसता आंबेडकर ।।१।।
आला नसता भीम तर ठाई ठाई जाऊनी
ठिणगी ठिणगी होऊनी झडला नसता आंबेडकर ।।२।।
आला नसता भीम महाडच्या क्रांतीसाठी असा
क्रांतीच्या गर्भासाठी लढला नसता आंबेडकर ।।३।।
आला नसता भीम तर इतिहास घडला नसता
घराघरातील फोटो मधी मढला नसता आंबेडकर ।।४।।
आला नसता भीम तर माणुसकीसाठी असा
माणुसकीचा हा लढा लढला नसता आंबेडकर ।।५।।
आला नसता भीम जर वादळवारा होऊनी
वामनाच्या पदरी असा पडला नसता आंबेडकर ।।६।।