तुझे उपकार
झाला तूच दुधाची धार विसरू कसे तुझे उपकार
सारे मांग, महार, चांभार विसरू कसे तुझे उपकार ।।
तोड़नी जातीचे बंधन मोठे केले आपले मन
झाला आमचा तारण हार ।।
साऱ्या मांगा, महाराला
केला हौद खुला आपला
पाणी भरी तिथं चांभार ।।
आला तुझ्याच धरणी वर
झाला महान आंबेडकर
सारे तुझेच रे उपकार ।।
झाला क्रांतीचा तू हात
जाळली हलकी भारी जात
केला साऱ्यांचा उध्दार ।।
बाबा तुझीच रे छाती
झाली बुध्दाची क्रांती
केला समतेचा प्रचार ।।
होती शिक्षणास बंदी
दिली तूच आम्हाला संधी
झाला तूच खरा आधार ।।
सारे शूद्र आणि वामन
नमवू तुझ्याच ठाई मान
वाहू स्त्री मुक्तीचा भार ।।