दीनदलिताचा राजा
तू दीन दलिताचा राजा
पाठीचा बंधू माझा मला
एक दान दे पतीचे प्राण दे ।।
कस्तुरबा केवीलवाणी
डोळ्याचे गाळी पाणी
ती वदे भीमाच्या कानी
हो कानी वाणी दानी ।।
हे संकट सारे जावो
हा चुडा सलामत राहो
या म्हाताऱ्या बहिणीचा
तू ऐक मनाचा टाहो ।।
तो वामन गाता गाता
गाईल पुण्याची गाथा
तू दीनदयाळा आता
हो माझा भाग्य विधाता ।।