तुझे गीत गाऊ
तुझे गीत गाऊ तुझे गीत गाऊ
तुझे गीत गाऊ तिथे दीप लावू...।।
जिथे पीक नाही भूमी तीच हेरू
उभे रान घेऊ तुझे बीज पेरू
तुझ्याच बीजाचे उभे पीक पाहू...।।
तुझ्याच गुरुचे जगा तारणारे
मनातील काळे मनी मारणारे
धडे हे जगाला आम्ही देत राहू...।।
गरीबीची शोभा आता फार झाली
विकासाची गंगा आणू आज खाली
तुझ्या कार्यासाठी आभाळात जाऊ...॥
जिथे वामनाचे जिवा घोर झाले
इथे चोर झाले असे थोर झाले
पिटाळून लावू असे ऐतखाऊ...।।