भीमराव जिवाचा विसावा
भीमराव जिवाचा विसावा गं बाई
माझा भीमराव जीवाचा विसावा...।।धृ।।
त्याचे नाव घेता माझा शीनभाग जातो
जसा काही भीम माझ्या मदतीला येतो
सदा तोची मनी आठवावा...।।१।।
आळसही दूर झाला त्याच्या भजनानं
दळणंही होतं माझं गाता गाता गाणं
भीम माझा अंतरीचा ठेवा...।।२।।
भीम आला घरी झाला आनंदी आनंद
शिवीगाळी करीना आता ही नणंद
आनंदाने गातो जावा...।।३।।
सासूबाई जशी काय माऊलीच माझी
भावुर्जींनी सोडली आता दारूबाजी
करतात समाजाची सेवा...।।४।।
बंधू माझा वामन झाला भीमदास
भीम त्याच्या हृदयात करीतसे वास
असा भीम हृदयी वसावा...।।५।।