थोर चेला
थोर चेला गुरु गौतमाचा, एक भीमराव होऊन गेला
गुरु आणि चेल्याच्या बळाने, कोटी कोटीचा उध्दार केला ।।धृ।।
कीड जातीची लागून सारा, देश नरकात पडला बिचारा
मांग, चांभार, भंगी, बलाई, जिते असता गमे आज मेला ।।१।।
गौतमाच्या विचाराचे तारू, लागला भीम येथे हाकारू
जो तो तारूत येऊन बसला किनाऱ्याला तो येऊन गेला ।।२।।
आज ना उद्या भारतात, बुध्दा येईल वरच्या थरात
याच मार्गाने येणे जगाला शेवटी हेच सांगून गेला ।।३।।
आज जीर्ण रुढीतून वामन, सोडविता इथे माणसाला
साद घाली भीमा गौतमाला धावूनी येईल मच्या हाकेला ।।४।।