जयगान
गाऊ या जयगान
करू सन्मान पूजा त्या मूर्तीला
उरला जो अंधार उभ्या धरतीला ।।धृ।।
ओस होती सारी ही भूमी एके काळी
राबला हो येथे माझा तो फुल माळी
ज्ञान सागराचे पाणी ही भूमी प्याली
तरारुन आली ही रोपटे मेलेली
फुले फुलली छान असा गुनवान मिळाला धरतीला ।।१।।
गावकीची काठी ती कांबळी ना काठी
झुंजला तो नेता ती पेटविण्यासाठी
बोलली गुलामी जाळील रे तुला मी
करतडून टाकील ह्या कोवळ्या फुला मी
येता हे आव्हान तयाच प्राण लाविलं शांतीला ।।२।।
दिन बंधू होता तो समता सिंधू होता
जाति जाळणारा तो न्यारा हिंदू होता
थोर धर्मदाता तो मानवतेचा त्राता
गौतमाचा चेला तो झाला जाता जाता
केले कार्य महान गुणी विव्दान नसावा धरतीला ।।३।।
जान वेड्या वामन तो तो तुझा धनी आहे
भावी भारताचा तो कंठमणी आहे
थोर घटनाकार त्या प्रेमाने स्वीकारा
साद घरी सारे या त्याच्या जयजय करा
नमवा इथे मान नको आवमान उभ्या आरतीला ।।४।।