भीम माळी
दूजा नाही असा फूल माळी
भीम माळ्याची महिमा निराळी।।धृ।।
भल्या पहाटेच गाऊन गाणी
आसवांचेच घालून पाणी
फुले फुलवित होता सकाळी ।।१।।
टवटवी ती निराळीच होती
रूपरंग झळाळीच होती
फुले सुकण्याची आली न पाळी ।।२।।
रोज वामन पहाटी, पहाटी
सारी मोडून जगाची रहाटी
का न गावी भीमाची भूपाळी ।।३।।