सारे सारे चोर इथे
सारे सारे चोर इथे । सारे सारे चोर ।
आई तुझा भीमा होता । खरा बंडखोर ।।धृ।।
गुलामीची सारी ओझी । वाहणारा शिवाजीप्रमाणे
स्वप्न पाहणार झाला घटनाकार एका महाराचा पोर ।।१।।
कधी झोपणारे, कधी जागणारे ।
भीमाच्या श्रमाचा वाटा मागणारे
खोटे सारे थोर इथे, खोटे सारे थोर ।।२।।
तुझ्याच कुशिने, मला मुक्त केले ।
सारे सुख माझ्या अंगनात ठेवले ।
कापला भीमाने माझ्या गुलामीचा दोर ।।३।।
मनातील सारा सारा कोंडमारा ।
वामनपरी हा फुलवी पिसारा
नाचतसे आज माझ्या मनातील मोर ।।४।।