समाधीकडे त्या वाट
समाधीकडे त्या वाट ही वळावी
तिथे आसवांची फुले ही गळावी... ।।धृ।।
जिथे माऊलीची चिता ही जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळाली.... ॥१॥
लाविता समाधी समाधी समोरी
दशा या जिवाची आईला कळावी... ।।२।।
पाहण्या सदा त्या मुख माऊलीचे
तिथे थोडी जागा मला ही मिळावी... ।।३।।
वामन मला तू जाळशील जेव्हा
समाधी पुढे त्या चिता ही जळावी... ।।४।।