दलिताचा राजा
कोटी कोटी काळजात
भीम माझा होता
सात कोटी दलितांचा
तोच राजा होता ।।धृ।।
काल माझा भीम होता, रणा मधी खडा
माणसाच्या मुक्ती, देत होता लढा
कालचाच इतिहास ताजा ताजा होता ।।१।।
अशी माझी भीम सेना, पाहुनिया या सारी
कामगार सेना, लाजली बिचारी
अशा भीम क्रांतीचा
गाजा वाजा होता ।।२।।
पोलादाचा दंड माझा, भीमराव होता
जोतिबाचं बंड माझा, भीमराव होता ।।३।।
आघाडीला शाहिराची, फौज गात होती
वामनची फौज अशी, पुढे जात होती
साच्यांच्या आघाडीला
भीम माझा होता ।।४।।