रात आली संकटाची
रात आली पुन्हा संकटाची
याद आली तुझ्या मनगटाची
थोर करणी तुझी विश्व जानी
तूच शेंडी उपटली भटाची ॥धृ॥
दंड एके दिवशी ठोकले तू
वैरी वाटेवरी रोखले तू
तूझ्या पाठी तुझे तूच वैरी
आग झाली मनूच्या मठाची ।।१।।
तीच ममता जगातून जाता
माय झाली तुझी थोर ममता
जिते जाळी इथे मानसाला
काळी करणी अरिच्या कटाची ।।२।।
घरे जळती तिथे जीव पळती
तरी वैरी तुझे खूप छळती
अशी वामन परि घाव घाली
जात जुल्मी जुनी हलकटाची ।।३।।