फूल कमळाचे
फूल कमळाचे सुंदर ते छान
तसे भीमराव माझे महान ।।धृ।।
जशी तेलाने ज्योती जळावी
भीमा पासून स्फूर्ती मिळावी
इथे समतेला मिळाले ते स्थान ।।१।।
कवटाळूनी भुजंग चंदनाला
विष बाधा कधी नाही त्याला
इथे नाही त्या चंदना समान ।।२।।
सत्य शांतीचा चालविला डाव
त्या मार्गाचा आहे प्रभाव
वामन तुझी लेखणी महान ।।३।।