अवनिच्या कानी
अवनिच्या कानी सांगते आकाश
भीमाचा प्रकाश आहे, आहे ।।
गेला रण जातीच्या राजगृहा माजी
वंश वेल ताजी आहे, आहे ।।
एकुलता एक होता यशवंत
आता तीच खंत आहे, आहे ।।
मीराबाई माता चार लेकुरांची
साऊली घराची आहे, आहे ।।
मीराबाई पोटी जन्मला प्रकाश
काळोखाचा नाश आहे, आहे ।।
जिथे जिथे वामन तुझे गीत आहे
तिथे दलिताचे खरे हीत आहे ।।