नवं कोटीचा राजा
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुध्दस ।
बुध्दं शरणं गच्छामी । धम्मं सरणं गच्छामी ।
सघं सरणं गच्छामी ।।
राजा, नव कोटीचा राजा, दयाळु दाता माझा ।
दयाळु दाता माझा जा पुजा गं...।।धृ।।
त्या पिंपळपारावर राजगृहापरी सुंदर
ध्यानस्थ आसनावर बसविला भीम भास्कर
दर्शनास नारी नर येतील गडे दिनभर
लगबगीन तुम्ही जा जा...।।१।।
त्यानं रुढी बंधनातून काढीले तुम्हा ओढून ।
आठवून तयाचे ऋण, व्हा मुक्त तुम्ही त्यातून ।
गाऊन तयाचे गुण, टाकावे गाव गर्जुन
ही अशीच आरती गा जा...।।२।।
जाऊन स्मारकाकडे जा पूजा पहाटे गडे ।
कशी रास फुलांची पडे दरसाल पुण्य एवढे ।
वर्षात दोन दा घडे जा रांग लावण्या पुढे
फुलहार घेऊनी ताजा...।।३।।