भीमाची लेखणी
जगातील देखनी
जगातली देखनी आगं जगातली देखनी ।
गं बाई मी भीमाची लेखनी । बाई मी भीमाची लेखनी...।।धृ।।
काळ्या मनुचा ईमला मी पाडीला ।
त्यात मनूचा मुडदा मी गाडीला ।
मुडदा मनूचा मीच पाडिला रणी...।।१।।
आयर्या गयऱ्याच्या उनाड लेखण्या ।
दिसती दिसायला देखण्या ।
काळ्या मनाच्या काळ्या साच्याजनी. ।।२।।
क्रांतिवीराची केली मी चौकशी ।
मैत्री भीमाशी जडली माझी अशी ।
मूर्ती भीमाची ठसली माझ्या मनी...।।३।।
भीम रमाचा वामनचा सारथी ।
त्या बलभीमाची झाली मी भारती ।
झाले भीमाच्या आम्ही दोघी जनी...।।४।।