मन उजळावे
तन उजळे पण मन उजळावे
सांगून गेले कबीर
पाई त्यांच्या नमीतो मी शीर।।
कवणे सारी तथागताची
आला कबीर होऊन साथी
तशीच वाणी ज्योतीबाची
देई मनाला धीर।।
आज ही वेरूळ आणि अजिंठा
उभे उंचवून आहेत माथा
मानवतेचा सारा साठा
आहे तिथे तो स्थिर।।
जन्मभूमी कबीराची काशी
इथे लुंबिनी इथेच काशी
उलळीत पाने इतिहासाची गेले ते नरवीर।।
भीम दुजा करूणेचा सिंधू
चरण तयाचे प्रेमे वंदू
ताईतासम कांठी बांधू
वीर असा रणधीर।।