खीर गार झाली
खीर गार झाली बोलली सुजाता
एक तरी घास घे रे घे रे भगवंता।।
रहासी उपाशी रांगोळी रूपाची
कोणत्या जगाची तऱ्हा ही तपाची
कोमेजली काया किती रे महंता।।
कोवळ्या तनुचा कोळसा करूनी
बसलास हेतू कोणता धरूनी
अशा मरणदारी कारे गुणवंता।॥
वामन उन्हाचा ध्यास हा कुणाचा
वनी अडचणीचा वास हा कुणाचा
विनवित होती कुणाला सुजाता।।