स्वामी विवेकानंद
इ. स. १८९३ मध्ये अमेरिकेत शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये "माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो" असे उद्गार काढून विश्वबंधुतेचे नाते प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद कोपाला बरे परिचित नाहीत ? आपण त्यांना स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. १२ जानेवारी १८६३ या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथबाबू व आईचे नाव भुवनेश्वरीदेवी होते. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते. त्या उभयतांचा स्वभाव उदार व दुःखीतांविषयी कणव असणारा होता. आई भुनवेश्वरीदेवी बुद्धिमान व वृत्तीने धार्मिक होत्या. अशा - मातापित्यांनी उत्तम संस्कार करून नरेंद्रना घडवले.
बाळ नरेंद्र फार अवखळ व खोडकर होते. त्यांना विविध खेळांची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्याला थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत घातले. तेथेही नरेंद्रवर उत्तम संस्कार घडले.
बालपणापासूनच नरेंद्रना उत्तम एकाग्रतेची देणगी लाभली होती. त्यायोगे ते कोणताही विषय चट्कन आत्मसात करीत असे. शालेय अभ्यासातही हुशार असल्याने ते मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. पुढील अभ्यासासाठी त्यांचे महाविद्यालयात नाव दाखल केले. सर्वच विषयांमध्ये त्यांना सारखीच गोडी होती. वाचनालयात जाऊन ते नाना विषयांचे वाचन करीत. तत्त्वज्ञानाचे मिळालेले सर्व पाश्चिमात्य ग्रंथ त्यांनी वाचून काढले. त्यामुळे त्याची तीक्ष्ण बुद्धी है चिकित्सक बनली.
नोव्हेंबर १८८० मध्ये नरेंद्र यांचा परिचय दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंसांशी झाला. त्यांना नरेंद्रविषयी अनिवार जिव्हाळा निर्माण झाला. ते नरेंद्रचे गुरू झाले. त्यांनी योगमार्गाचा आपला वारसा नरेंद्रकडे सोपवून पुढे कार्य करण्यास सांगितले. येथे नरेंद्र यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
नरेंद्र यांनी हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला. १८९३ मध्ये त्यांना अमेरिकेतील शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेची माहिती समजली. त्यांची योग्यता जाणलेल्यांनी त्यांना या परिषदेस जावे, असा आग्रह धरला. सर्व प्रकारच्या सहाय्याची तयारी दर्शवली. नरेंद्र यांनी या परिषदेस जाण्याचा निश्चय केला, त्यांनी संन्यासाचा स्वीकार केला व स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले. ३१ मे १८९३ रोजी ते शिकागोस गेले. तेथे परिषदेस उपस्थित असणारे सर्व जगातून आलेले नाना धर्मीय लोक स्वामी विवेकानंदाच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले.
तेथे कोणत्याही धर्मपंडिताने न म्हटलेले. 'माझ्या "बंधू-भगिनींनो" असे जगाविषयी आत्मियता प्रस्थापित न करणारे उद्गार काढून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या हृदयाचीच पकड घेतली. तेथे केलेल्या व्याख्यानात त्यांनी 'सर्व धर्म एकच अंतिम उद्दिष्टांसाठी आहेत, एकाच मार्गाच्या वाटसरूंमध्ये परस्पर दुजाभाव आणि अविश्वास शोभत नाही. एका धर्माचा दुसऱ्या धर्माशी झगडा असूच शकत नाही. सर्व धर्मांना अधर्माशी लढायचे आहे,' असे सर्व धर्मामध्ये अनुपम स्नेहबंध निर्माण करणारे उद्गार काढले. त्यामुळे परिषदेमध्ये एकमेकांना वादात जिंकण्याऐवजी नवे स्नेहसौहार्दाचे व समजूतदारपणाचे वातावरण निर्माण झाले. या परिषदेमध्ये त्यांनी ओघवत्या भाषेत हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदात्तता सर्वांना पटवून दिली.
या परिषदेनंतर स्वामी विवेकानंद दोन वर्षे अमेरिकेत कार्यरत राहिले. त्यांचा मित्रपरिवार वाढला. त्यांच्या चाहत्यांनी तेथे त्यांची अनेक व्याख्याने घडवून आणली. त्यातून विवेकानंदांनी हिंदू धर्माचा महान संदेश तेथील लोकांपर्यंत पोहोचवला.
अमेरिकेतील कार्य तसेच चालू राहील, अशी व्यवस्था करून स्वामीजी इंग्लंडला आले. तेथेही त्यांनी व्याख्याने दिली. इंग्लंडमध्ये त्यांना अनेक अनुयायी है मिळाले. कु. मागरिट नोबेल यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारून भगिनी निवेदिता हे नाव धारण केले.
आपल्या परदेशातील वास्तव्यास स्वामी विवेकानंदांनी आपल्या धर्मसंस्कृतीची पताका पाश्चिमात्य देशात फडकावून हिंदू धर्माचे उज्वल दर्शन घडविले. १८९६ च्या अखेर ते भारतात परतले. पाश्चात्य देशातील सुबत्ता व समृद्धी पाहून स्वामी विवेकानंदांना भारतातील दीन व हलाखी अधिक जाणवली. त्यातून 'आर्त-दलित-उपेक्षित, यांच्या सेवेतून आत्मोद्धार होऊ शकतो हे समाजाला शिकवले पाहिजे, अशी त्यांची धारणा बनली. १ मे १८९७ रोजी त्यांनी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून जनतेच्या उद्धारासाठी एक सेवासेना उभारण्याचे आपले स्वप्न बोलून दाखविले. हा विचार सर्वांना पटला : व 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना झाली. निरनिराळ्या धर्मांच्या अनुयायांमध्ये बंधूभाव उत्पन्न व्हावा यासाठी रामकृष्ण परमहंसांनी केलेल्या कार्याची धूरा या मिशनने खांद्यावर घेतली. संन्यस्त वृत्तीने समाजसेवा करीत राष्ट्राची उभारणी करण्याचे कार्य या मिशनने हाती घेतले.
राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी बाळगून कार्य करीत असतानाच स्वामी विवेकानंदांची प्रकृती मात्र खंगत चालली. त्यांना दम्याचा विकार जडला. रात्र-रात्र झोप लागत नसे. त्याही स्थितीत त्यांचे समाजप्रबोधन विचारांचा प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी प्रवास चालूच होते. १८९९ साली ते पुन्हा परदेशाच्या प्रवासास निघाले. त्यामध्ये त्यांनी न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली.
कॅलिफोर्नियात शांतीआश्रम स्थापन केला. पॅरिसमध्ये भरलेल्या धर्म उत्क्रांती परिषदेसही उपस्थित राहून ते भारतात परतले. या प्रवासात स्वामीजींना मधुमेहाचा विकारही जडला. तरी पत्रव्यवहार, लेखन, प्रवचने, व्याख्याने, आश्रमवासीयांना शिकवणे असे त्यांचे बहुविध कार्य उत्साहाने सुरूच होते. त्या दरम्यानच स्वामीजींना जलोदर या व्याधीने ग्रासले. ते कडक पथ्यपाणी पाळू लागले, पण काळ जवळ आल्याची त्यांना जाणीव झाली. ४ जुलै १९०२ रोजी त्यांनी लवकरच उठून तीन तास ध्यान केले.
दुपारी हास्यविनोद करीत भोजन घेतले. दोन-अडीच तास आश्रमवासीयांचा अभ्यास घेतला. संध्याकाळी ते थोडे फिरून आले. आश्रमवासीयांशी त्यांनी निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा केली. नंतर शांतपणे योगमार्गाने त्यांनी देहविसर्जन केले.
अवघे, ३९ वर्षांचे आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभले, पण या अल्पावधीत त्यांनी युगानुयुगांचे प्रचंड कार्य केले. त्यांनी पाश्चात्य देशातील भौतिकवादाचा भारतीय अध्यात्मवादांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. अनेक पाश्चात्य देशांना भेटी देऊन तेथील लोकांना के हिंदू धर्माचे व अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व लोकांना पटवून देणे, हिंदू धर्माच्या खऱ्या तत्त्वज्ञानाची ओळख करून देणे इत्यादी कार्ये या मिशनने केली. तसेच ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्तीवर लोकसेवेचे कार्यही या है मिशनने केले.
धार्मिक सुधारणेतच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचेही प्रयत्न केले. या मिशनने ठिकठिकाणी अनाथाश्रम, रुग्णालये, वसतिगृहे यांची स्थापना केली, नैसर्गिक आपत्तीच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही रामकृष्ण मिशनने पुढाकार घेतला.स्वामी विसेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व स्वदेशाभिमान यांची ओळख भारतीयांना करून देण्याचे आणि त्यांना कार्यप्रवण बनविण्याचे कार्यही केले.
भारताच्या थोर संस्कृतीचा व उदात्त मानवतावादी तत्त्वज्ञानाचा जगाला परिचय करून देण्याचे महान कार्य करून स्वामी विवेकानंदांनी भारताच्या भावी पिढ्यांसाठी एक थोर आदर्श व वारसा ठेवला आहे.