डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr. BabaSaheb Ambedkar | Information About Dr. BabaSaheb Ambedkar in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर   अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविणारा पहिला महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदेपंडित, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्वान अशा अनेक बिरुदावली लाभलेल्या या युगप्रवर्तकाचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मांडणगाव, तालुक्याती 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्यात सुभेदार-मेजर या पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले, ते आंबवडेचे असल्यामुळे त्यांना आंबेडकर असे म्हणू लागले.   त्यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव इ.स. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. इ.स. १९१२. ला पदवी (बी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिठात त्यांना प्रवेश मिळाला. त्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांचे सहाय्य लाभले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. इ.स. १९१५ मध्ये त्यांनी 'प्राचीन भारतातील व्यापार' या विषयावर प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळविली व त्यांच्या 'National Dividend of India a historical and analytical study' या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी. ही पदवी बहाल केली.   अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून आंबेडकर भारतात परत आले व बडोदा संस्थानात नोकरी केली. त्यानंतर आंबेडकर, कायदा व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले; परंतु आर्थिक अडचणीमुळे ते परत भारतात आले. काही काळ त्यांनी मुंबईच्या 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली.   मुंबईमध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. ३१ जानेवारी १९२० मध्ये त्यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी भाग घेतला; परंतु शिक्षणाच्या लालसेने १९२० मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीवर ते पुन्हा इंग्लंडला गेले व तेथे त्यांनी लंडन विद्यापीठातून बी.एस. सी. केली व The problem of rupee' या प्रबंधाबद्दल त्यांना डी.एस.सी. ही पंदवी मिळाली. त्यानंतर लवकरच ते बॅरिस्टरच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. १९२३ मध्ये परत भारतात आल्यावर त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी इ.स. १९२४ ला 'बहिष्कृत हितकारिणी' सभेची स्थापना केली. तसेच "बहिष्कृत भारत" हे साप्ताहिक सुरू केले. तसेच या सभेतर्फे दलित सभाजातील तरुण व प्रौढांसाठी रात्रशाळा चालविणे, वाचनालये सुरु करणे यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले. इ.स. १९४६ मध्ये त्यानी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन केली तिच्या वतीने मुंबईला 'सिद्धार्थ कॉलेज' व औरंगाबादला 'मिलिंद महाविद्यालय' सुरू केले. तसेच दलित विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे सुरू केली.   हिंदू समाजातील जातीभेद नष्ट व्हावा, समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी इ.स. १९२७ साली 'समाज समता संघ' स्थापन केला. या संघातर्फे 'समता' हे आणखी एक वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९२७ मध्ये बाबासाहेबांची मुंबई विधिमंडळावर निवड झाली.   महाड या गावी चवदार तळ्याचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता. तेथील नगरपालिकेने ठराव करून हे तळे अस्पृश्यांसाठी सुरू केले होते; परंतु सुवर्ण हिंदूंच्या भीतीने हे अस्पृश्य बांधव तेथे जाऊ शकत नव्हते. तेव्हा आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी सत्याग्रह करून त्या तळ्याच्या पाण्यावर अस्पृश्यांचाही हक्क आहे, याची जाणीव सर्वांना करून दिली. सामाजिक भेदभाव आणि उच्च-निच्च भेदभाव याचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मूतीचे जाहिररित्या दहन केले.   हिंदू धर्मातील उच्चवर्णियांनी अस्पृश्यांना नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश नाकारला होता. याविरुद्ध डॉ. आंबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी मंदिरासमोर सत्याग्रह केला त्याबाबतीत आंबेडकर म्हणतात की. 'हिंदुत्व ही जितकी स्पृशांची मालमत्ता आहे, तितकीच ती अस्पृश्यांची आहे. म्हणून मंदिर प्रवेशाचा हक्क मान्य झालाच पाहिजे. १९३५ पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता. अशाच प्रकारे अचलपूर येथील दत्त मंदिर सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अमरावतीचे अंबापाता मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. यामागे आंबेडकरांची प्रेरणा होती.   नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. तसेच पुढील दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेचे (१९३०- ३२) साली प्रतिनिधित्वही त्यांनीच केले. यामध्ये आंबेडकरांनी राखीव जागांची मागणी केली आणि स्वतंत्र मतदार संघाचीही मागणी केली होती.   अस्पृश्यांना हिंदूपासून अलग करणाऱ्या जातीय निवड्याविरुद्ध महात्मा गांधींनी पुणे येथे येरवडा तुरुंगातच प्राणांतिक उपोषण सुरू केले. तेव्हा तडजोड, म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात असे ठरले त्यानुसार अशा १४८ राखीव जागांसाठी डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ ला करार झाला. यालाच पुणे करार अथवा येरवडा करार असे म्हणतात.   स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकर नेहरू मंत्रिमंडळात कायदामंत्री झाले. घटना समितीच्या 'मसुदा समिती' चे ते अध्यक्ष होते. १९४९ मध्ये त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. हिंदूकोड बिलाची निर्मिती ही त्यांनीच केली. पुढे याच बिलाच्या वादावरून संसदेत श्रेष्ठींशी मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भारताची राज्यघटना २ वर्षे ११ महिने १८ दिवसांत तयार केली. म्हणून त्यांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हणतात.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील 'येवला' येथे बोलताना धर्मांतराची जाहीर घोषणा केली. त्यामुळे देशात वादळ उठले. येवला येथील भाषणात त्यांनी घोषणा केली की, ' मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.' परंतु प्रत्यक्षात धर्मांतराचा निर्णय १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी अमलात आणला. नागपूर येथे त्यांच्या सोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी 'बौद्ध' धर्मात प्रवेश केला, बौद्ध धर्माची दिक्षा त्यांनी "चंद्रमणी महास्थिर" यांच्याकडून घेतली.   बाबासाहेब विद्येचे भोक्ते होते. अखंड वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांच्या स्वत:च्या ग्रंथालयातील ग्रंथसंख्या जवळ-जवळ २५ हजार होती. १९४२ साली में त्यांनी 'शेड्युल कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली, तर में १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' ची स्थापना केली.   डॉ. आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले. ज्यामुळे समाज परिवर्तनास मदत झाली. अनेक वर्षाच्या राजकीय, सामाजिक, कामांच्या न संपणाऱ्या दगदगीने आंबेडकरांची प्रकृती फारच खराब झाली होती. मधुमेहाचा त्रास त्यांना फार वर्षापासून होताच. राज्यघटना तयार करण्याचे काम चालू असतानाच ते फार आजारी झाले. त्यांना मुंबईला रुग्णालयात ठेवले होते. तेथे डॉ. शारदा कबीर त्यांच्यावर औषधोपचार करीत होत्या. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई १९३४ साली मरण पावल्या. त्यानंतर ते आपले आयुष्य एकट्यानेच ओढत होते. आता या उतारवयात व बऱ्या न होणाऱ्या आजारपणात त्यांना सोबतीची आधाराची गरज भासू लागली. डॉ. शारदा कबीरही आंबेडकरांच्या उच्च आचारविचारांनी त्यांच्या भक्त बनल्या होत्या. दोघांनी विवाह करण्याचे ठरविले व मुंबईला अत्यंत साधेपणाने हा विवाह साजरा झाला. त्यांच्या नवीन पत्नीने पुढल्या सात-आठ वर्षांत आंबेडकरांची फार ममतेने सेवा केली.   परंतु आता दिव्यातील तेल संपत आले होते. दि. ४ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकर राज्यसभेत जाऊन आले. ५ तारखेला जैन लोकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी काही चर्चा केली. प्रकृती नादुरुस्त होतीच तरी नित्याप्रमाणे आंबेडकरांची कामे चालूच होती. हिंदी संतकवी कबीर त्यांचा फार आवडता आणि श्रद्धेचा विषय होता. त्यांची अनेक पदे ते नेहमी गुणगुणत असत. त्यादिवशी असेच ते यांचे 'चलो कबीर, तेरा भवसागर डेरा' हे पद स्वतःशीच सारखे म्हणत होते, हे कशाचे सुचक म्हणायचे?   रात्री ते नेहमीसारखेच जाऊन झोपले आणि झोपेतच त्यांचे पहाटे निधन झाले. ती तारीख 5 डिसेंबर १९५६. त्यांच्या निधनाने सारा देश हादरला. दलितांना तर आपले मायेचे छत्र हरपले असे वाटले. त्यांच्या शोकास पारावर राहिला नाही. आंबेडकरांचा पार्थिव देह मुंबईला आणण्यात आला. दादरच्या चौपाटीवर (चैत्यभूमी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अखंड जळणारी ज्वाला चितेच्या ज्वालामध्ये मिसळून गेली. अत्यंत खडतर परिस्थितीतून आंबेडकरांनी स्वत:चा जीवनमार्ग शोधला आणि स्वतः बरोबरच साऱ्या दलित वर्गालाही त्या मागावरून चालण्याची प्रेरणा दिली. जीवनात पावला-पावलाला अनेकांशी झगडा करावा लागल्याने भांडखोर, हटवादी, तुसडे आहेत, असे लोकाना वाटे. पण त्यांचा राग हा त्या-त्या प्रसंगापुरता असे. एरव्ही हे शांत, संयमी, निगर्वी, प्रसिद्धी विन्मुख आणि अतिशय सुसंस्कृत असे महामानव होते. त्यांच्यासारखा ज्ञानोपासक शतकातून एकदाच होत असतो. त्यांचा स्वत:चा ग्रंथसंग्रह अक्षरशः प्रचंड म्हणावा असा होता. मृत्यूपूर्वी त्यांनी तो मुंबईत स्वतः स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाला देऊन टाकला.   शेवटी आता एकाच गोष्टीचा विचार करावयाचा की, आंबेडकरांनी भारताला कोणती देणगी दिली? मला वाटते त्यांनी एक अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली. अतिशय उदार आणि प्रगतशील असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला आणि हजारो वर्षे अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला. यामुळे सर्व भारतीय आधुनिक मनू म्हणून त्यांचा अतीव आदराने नेहमीच सन्मान करतील ! बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीच्या महोत्सवाच्या प्रारंभाचा योग म्हणजे १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविणारा पहिला महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदेपंडित, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्वान अशा अनेक बिरुदावली लाभलेल्या या युगप्रवर्तकाचा जन्म मध्यप्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मांडणगाव, तालुक्याती 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्यात सुभेदार-मेजर या पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले. त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले, ते आंबवडेचे असल्यामुळे त्यांना आंबेडकर असे म्हणू लागले.


त्यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. भीमराव इ.स. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. इ.स. १९१२. ला पदवी (बी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी बडोदा सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व अमेरिकेतील कोलंबिया विद्यापिठात त्यांना प्रवेश मिळाला. त्यासाठी त्यांना महाराज सयाजीराव गायकवाडांचे सहाय्य लाभले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र इत्यादी विषयांचे अध्ययन केले. इ.स. १९१५ मध्ये त्यांनी 'प्राचीन भारतातील व्यापार' या विषयावर प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळविली व त्यांच्या 'National Dividend of India a historical and analytical study' या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी. ही पदवी बहाल केली.


अमेरिकेतील अभ्यासक्रम पूर्ण करून आंबेडकर भारतात परत आले व बडोदा संस्थानात नोकरी केली. त्यानंतर आंबेडकर, कायदा व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले; परंतु आर्थिक अडचणीमुळे ते परत भारतात आले. काही काळ त्यांनी मुंबईच्या 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली.


मुंबईमध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. ३१ जानेवारी १९२० मध्ये त्यांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले. माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी भाग घेतला; परंतु शिक्षणाच्या लालसेने १९२० मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीवर ते पुन्हा इंग्लंडला गेले व तेथे त्यांनी लंडन विद्यापीठातून बी.एस. सी. केली व The problem of rupee' या प्रबंधाबद्दल त्यांना डी.एस.सी. ही पंदवी मिळाली. त्यानंतर लवकरच ते बॅरिस्टरच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले. १९२३ मध्ये परत भारतात आल्यावर त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी इ.स. १९२४ ला 'बहिष्कृत हितकारिणी' सभेची स्थापना केली. तसेच "बहिष्कृत भारत" हे साप्ताहिक सुरू केले. तसेच या सभेतर्फे दलित सभाजातील तरुण व प्रौढांसाठी रात्रशाळा चालविणे, वाचनालये सुरु करणे यासारखे उपक्रम सुरु करण्यात आले. इ.स. १९४६ मध्ये त्यानी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन केली तिच्या वतीने मुंबईला 'सिद्धार्थ कॉलेज' व औरंगाबादला 'मिलिंद महाविद्यालय' सुरू केले. तसेच दलित विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहे सुरू केली.


हिंदू समाजातील जातीभेद नष्ट व्हावा, समता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी इ.स. १९२७ साली 'समाज समता संघ' स्थापन केला. या संघातर्फे 'समता' हे आणखी एक वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९२७ मध्ये बाबासाहेबांची मुंबई विधिमंडळावर निवड झाली.


महाड या गावी चवदार तळ्याचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना मज्जाव होता. तेथील नगरपालिकेने ठराव करून हे तळे अस्पृश्यांसाठी सुरू केले होते; परंतु सुवर्ण हिंदूंच्या भीतीने हे अस्पृश्य बांधव तेथे जाऊ शकत नव्हते. तेव्हा आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी सत्याग्रह करून त्या तळ्याच्या पाण्यावर अस्पृश्यांचाही हक्क आहे, याची जाणीव सर्वांना करून दिली. सामाजिक भेदभाव आणि उच्च-निच्च भेदभाव याचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मूतीचे जाहिररित्या दहन केले.


हिंदू धर्मातील उच्चवर्णियांनी अस्पृश्यांना नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश नाकारला होता. याविरुद्ध डॉ. आंबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी मंदिरासमोर सत्याग्रह केला त्याबाबतीत आंबेडकर म्हणतात की. 'हिंदुत्व ही जितकी स्पृशांची मालमत्ता आहे, तितकीच ती अस्पृश्यांची आहे. म्हणून मंदिर प्रवेशाचा हक्क मान्य झालाच पाहिजे. १९३५ पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता. अशाच प्रकारे अचलपूर येथील दत्त मंदिर सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अमरावतीचे अंबापाता मंदिर सर्वांना खुले करण्यात आले. यामागे आंबेडकरांची प्रेरणा होती.


नोव्हेंबर १९३० मध्ये लंडन येथे भरविण्यात आलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. तसेच पुढील दुसऱ्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेचे (१९३०- ३२) साली प्रतिनिधित्वही त्यांनीच केले. यामध्ये आंबेडकरांनी राखीव जागांची मागणी केली आणि स्वतंत्र मतदार संघाचीही मागणी केली होती.


अस्पृश्यांना हिंदूपासून अलग करणाऱ्या जातीय निवड्याविरुद्ध महात्मा गांधींनी पुणे येथे येरवडा तुरुंगातच प्राणांतिक उपोषण सुरू केले. तेव्हा तडजोड, म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात असे ठरले त्यानुसार अशा १४८ राखीव जागांसाठी डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ ला करार झाला. यालाच पुणे करार अथवा येरवडा करार असे म्हणतात.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकर नेहरू मंत्रिमंडळात कायदामंत्री झाले. घटना समितीच्या 'मसुदा समिती' चे ते अध्यक्ष होते. १९४९ मध्ये त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. हिंदूकोड बिलाची निर्मिती ही त्यांनीच केली. पुढे याच बिलाच्या वादावरून संसदेत श्रेष्ठींशी मतभेद होऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी भारताची राज्यघटना २ वर्षे ११ महिने १८ दिवसांत तयार केली. म्हणून त्यांना 'भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हणतात.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील 'येवला' येथे बोलताना धर्मांतराची जाहीर घोषणा केली. त्यामुळे देशात वादळ उठले. येवला येथील भाषणात त्यांनी घोषणा केली की, ' मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.' परंतु प्रत्यक्षात धर्मांतराचा निर्णय १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी अमलात आणला. नागपूर येथे त्यांच्या सोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी 'बौद्ध' धर्मात प्रवेश केला, बौद्ध धर्माची दिक्षा त्यांनी "चंद्रमणी महास्थिर" यांच्याकडून घेतली.


बाबासाहेब विद्येचे भोक्ते होते. अखंड वाचन हा त्यांचा छंद होता. त्यांच्या स्वत:च्या ग्रंथालयातील ग्रंथसंख्या जवळ-जवळ २५ हजार होती. १९४२ साली में त्यांनी 'शेड्युल कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली, तर में १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' ची स्थापना केली.


डॉ. आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले. ज्यामुळे समाज परिवर्तनास मदत झाली. अनेक वर्षाच्या राजकीय, सामाजिक, कामांच्या न संपणाऱ्या दगदगीने आंबेडकरांची प्रकृती फारच खराब झाली होती. मधुमेहाचा त्रास त्यांना फार वर्षापासून होताच. राज्यघटना तयार करण्याचे काम चालू असतानाच ते फार आजारी झाले. त्यांना मुंबईला रुग्णालयात ठेवले होते. तेथे डॉ. शारदा कबीर त्यांच्यावर औषधोपचार करीत होत्या. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाई १९३४ साली मरण पावल्या. त्यानंतर ते आपले आयुष्य एकट्यानेच ओढत होते. आता या उतारवयात व बऱ्या न होणाऱ्या आजारपणात त्यांना सोबतीची आधाराची गरज भासू लागली. डॉ. शारदा कबीरही आंबेडकरांच्या उच्च आचारविचारांनी त्यांच्या भक्त बनल्या होत्या. दोघांनी विवाह करण्याचे ठरविले व मुंबईला अत्यंत साधेपणाने हा विवाह साजरा झाला. त्यांच्या नवीन पत्नीने पुढल्या सात-आठ वर्षांत आंबेडकरांची फार ममतेने सेवा केली.


परंतु आता दिव्यातील तेल संपत आले होते. दि. ४ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकर राज्यसभेत जाऊन आले. ५ तारखेला जैन लोकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी काही चर्चा केली. प्रकृती नादुरुस्त होतीच तरी नित्याप्रमाणे आंबेडकरांची कामे चालूच होती. हिंदी संतकवी कबीर त्यांचा फार आवडता आणि श्रद्धेचा विषय होता. त्यांची अनेक पदे ते नेहमी गुणगुणत असत. त्यादिवशी असेच ते यांचे 'चलो कबीर, तेरा भवसागर डेरा' हे पद स्वतःशीच सारखे म्हणत होते, हे कशाचे सुचक म्हणायचे?


रात्री ते नेहमीसारखेच जाऊन झोपले आणि झोपेतच त्यांचे पहाटे निधन झाले. ती तारीख 5 डिसेंबर १९५६. त्यांच्या निधनाने सारा देश हादरला. दलितांना तर आपले मायेचे छत्र हरपले असे वाटले. त्यांच्या शोकास पारावर राहिला नाही. आंबेडकरांचा पार्थिव देह मुंबईला आणण्यात आला. दादरच्या चौपाटीवर (चैत्यभूमी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अखंड जळणारी ज्वाला चितेच्या ज्वालामध्ये मिसळून गेली. अत्यंत खडतर परिस्थितीतून आंबेडकरांनी स्वत:चा जीवनमार्ग शोधला आणि स्वतः बरोबरच साऱ्या दलित वर्गालाही त्या मागावरून चालण्याची प्रेरणा दिली. जीवनात पावला-पावलाला अनेकांशी झगडा करावा लागल्याने भांडखोर, हटवादी, तुसडे आहेत, असे लोकाना वाटे. पण त्यांचा राग हा त्या-त्या प्रसंगापुरता असे. एरव्ही हे शांत, संयमी, निगर्वी, प्रसिद्धी विन्मुख आणि अतिशय सुसंस्कृत असे महामानव होते. त्यांच्यासारखा ज्ञानोपासक शतकातून एकदाच होत असतो. त्यांचा स्वत:चा ग्रंथसंग्रह अक्षरशः प्रचंड म्हणावा असा होता. मृत्यूपूर्वी त्यांनी तो मुंबईत स्वतः स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयाला देऊन टाकला.


शेवटी आता एकाच गोष्टीचा विचार करावयाचा की, आंबेडकरांनी भारताला कोणती देणगी दिली? मला वाटते त्यांनी एक अत्यंत उत्तम अशी राज्यघटना देशाला दिली. अतिशय उदार आणि प्रगतशील असा हिंदू कायदा हिंदू समाजाला दिला आणि हजारो वर्षे अपमानित स्थितीत पडलेल्या दलित बांधवांचा स्वाभिमान जागा केला. यामुळे सर्व भारतीय आधुनिक मनू म्हणून त्यांचा अतीव आदराने नेहमीच सन्मान करतील ! बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दीच्या महोत्सवाच्या प्रारंभाचा योग म्हणजे १४ एप्रिल १९९० रोजी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान करण्यात आला.


Post a Comment (0)
Previous Post Next Post