सरदार वल्लभभाई पटेल | Information About Sardar VallabhBhai Patel

सरदार वल्लभभाई पटेल   हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची धमक अंगी बाळगून असलेले. कसलेही संकट आले तरी मागे न हटता आपल्या निर्णयावर ठाम राहत कार्य सुरूच ठेवणारे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा झुंजार नेता सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय एकीकरणाचे शिल्पकार म्हणूनही त्यांची ओळख आहे.    सरदार वल्लभभाई जव्हेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नाडियादजवळच्या करमदस गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने अत्यंत कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. ते अतिशय हुशार, बुद्धिवंत व कष्टाळू होते. अभ्यासाची त्यांना भयंकर गोडी होती. उसने-पैशाने पैसे जमा करुन, मेहनत करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी पैशांची जमवाजमव केली, ते इंग्लडला गेले तेथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि भारतात परतले. ते बॅरिस्टर होऊन त्यांनी अहमदाबादला काही दिवस वकिली केली एक उत्तम वकील म्हणन ते नावारूपास येऊ लागले होते. अशातच महात्मा गांधीजींच्या देशसेवेचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी हे गांधीजींचे शिष्यत्व स्वीकारले. वकीली सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांनी देशसेवा करण्याचा खंबीर निश्चय केला.   एकदा खेडा जिल्ह्यात पावसाळ्यात हाहाकार माजला होता. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. हजारो लोक बेघर झाले होते. अशात वल्लभभाईच्या प्रेमळ हृदयाला पाझर फुटला ते पुरग्रस्तांसाठी, त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले. अन्न, कपडे गोळा करून त्यांचे पुनर्वसन करण्यात त्यांनी कसलीही कसर मागे सोडली नाही.   १९२८ साली घडलेला बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह ही त्यांच्या जीवनातील एक महत्वाची घटना. गुजरातमधील बार्डोली नावाच्या भागातील शेतकरी आपल्या शेतात घाम गाळत आनंदाने शेतीची मशागत करत होते. पावसाच्या मेहेरबांनीवर आलेल्या पिकाच्या आपल्या परीने जोपासना करत होते. इंग्रज सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांकडे वळले. त्यांनी या शेतकऱ्यांचा शेतीवरील कर म्हणजेच शेतसारा वाढविण्याचा निणर्य घेतला. विनाकारण शेतसारा वाढवल्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड संताप निर्माण झाला. एवढा शेतसारा भरणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते शेतसारा कमी करावा म्हणून त्यांनी इंग्रज सरकारला विनंती केली, पण सरकार काही तयार होईना, वल्लभभाईंना हे समजले ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. शेतकऱ्यांची संघटना तयार करून त्यांनी सरकारला शह दिला.   कोणत्याही परिस्थितीत शेतसारा भरणार नाही असे शेतकऱ्यांनी ठरवले. इंग्रजांच्या हा जुलूम अमान्य करत वल्लभभाईंनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सत्याग्रह पुकारला. इंग्रजांनी शेतकऱ्यांचा छळ सुरू केला. त्यांच्या घरादाराचा, गुराढोराचा लिलाव पुकारला पण हा लिलाव घ्यायला कुणीच पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी सरकारी यंत्रणेवर पूर्ण बहिष्कार टाकला. सरकार हैराण झाले. सर्व शेतकरी एकत्र येऊन एका आवाजात इंग्रजांना ठणकावून सांगत होते “नही देंगे, नहीं देंगे." बार्डोलीच्या या सत्याग्रहाला राष्ट्रीय स्वरूप आले. सर्वच भागातील शेतकरी खडबडून जागे झाले. सर्वांनी या सत्यागृहाला पाठिंबा दिला. १२ जनू १९२८ हा दिवस "बोर्डाली" दिन म्हणून पाळला. काहीही झाले तरी शेतकरी नमणार नाहीत याची खात्री इंग्रजांना पटली. वल्लभभाईच्या या खंबीर कामगिरीपुढे सरकारला झुकावे लागले. त्यांनी आपला हुकूम मागे घेतला. शेतकऱ्यांचा विजय झाला. वर्लभाईंचा जयजयकार झाला.   निर्भिडपणे सरकारला तोड देत आपली भूमिका तसूभरही न बदलणारे वल्लभभाईचे नेतृत्व पाहूनच त्यांना "'लोहपुरुष" ही पदवी प्रदान केली. आताच्या सरकारने में दिलेल्या पदव्यांपेक्षा/पुरस्कारांपेक्षा जनतेचे मनापासून प्रेमपूर्वक दिलेल्या या पदव्या खरंच कितीतरी लक्षमोलाच्या,..   जसे 'लोकमान्य' राष्ट्रपिता या पदव्याही अशाच पद्धतीने जनतेने आपल्या लाडक्या नेत्यांना बहाल केल्या. वल्लभभाई पटेल यांनाही लोक प्रेमाने, आदराने सरदार' म्हणू लागले. वल्लभभाईंनी देशासाठी अनेकवेळा कारावास भोगला. १९३१ साली कराची येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्ष होते. अनेक सत्याग्रह करत, चळवळीची कामे करत, भारतभूमीला पारतंत्र्याच्या बेडीतून सोडविण्यासाठी अनेक मार्गांनी इंग्रजांना नेस्तनाबूत करण्याचे धाडस या 'लोहपुरुषाने' दाखविले., अपार कष्टानंतर, अनेकांचे बलिदान झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सार्वभौम भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून वल्लभभाई पटेल यांची निवड झाली. त्यावेळी देशात अनेक संस्थाने होती. ब्रिटीशांनी जाता जाता त्या संस्थांनांना सार्वभौम अधिकार दिले होते त्यामुळे ती संस्थाने स्वतःला स्वतंत्र समजत होती भारतीय संघराज्यात ती समाविष्ट होण्यास नकार देत होती. ही संस्थाने स्वतंत्र राहिल्यास देशात पुन्हा हुकूमशाही माजण्याची दाट शक्यता होती आणि म्हणूनच वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानिकांना बळाच्या माध्यमाने वठणीवर आणले. भारतीय संघराज्यात विलिनीकरणाने भारत हा एक अखंड देश बनला. भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम झाला, याचे श्रेय वल्लभभाईंनाच जाते. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देऊन भारताचे हे लोहपुरुष १५ डिसेंबर १९५० रोजी अनंतात विलीन झाले.

सरदार वल्लभभाई पटेल


हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची धमक अंगी बाळगून असलेले. कसलेही संकट आले तरी मागे न हटता आपल्या निर्णयावर ठाम राहत कार्य सुरूच ठेवणारे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा झुंजार नेता सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय एकीकरणाचे शिल्पकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. 


सरदार वल्लभभाई जव्हेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नाडियादजवळच्या करमदस गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने अत्यंत कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. ते अतिशय हुशार, बुद्धिवंत व कष्टाळू होते. अभ्यासाची त्यांना भयंकर गोडी होती. उसने-पैशाने पैसे जमा करुन, मेहनत करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी पैशांची जमवाजमव केली, ते इंग्लडला गेले तेथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि भारतात परतले. ते बॅरिस्टर होऊन त्यांनी अहमदाबादला काही दिवस वकिली केली एक उत्तम वकील म्हणन ते नावारूपास येऊ लागले होते. अशातच महात्मा गांधीजींच्या देशसेवेचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी हे गांधीजींचे शिष्यत्व स्वीकारले. वकीली सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांनी देशसेवा करण्याचा खंबीर निश्चय केला.


एकदा खेडा जिल्ह्यात पावसाळ्यात हाहाकार माजला होता. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. हजारो लोक बेघर झाले होते. अशात वल्लभभाईच्या प्रेमळ हृदयाला पाझर फुटला ते पुरग्रस्तांसाठी, त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले. अन्न, कपडे गोळा करून त्यांचे पुनर्वसन करण्यात त्यांनी कसलीही कसर मागे सोडली नाही.


१९२८ साली घडलेला बारडोलीचा शेतकऱ्यांचा सत्याग्रह ही त्यांच्या जीवनातील एक महत्वाची घटना. गुजरातमधील बार्डोली नावाच्या भागातील शेतकरी आपल्या शेतात घाम गाळत आनंदाने शेतीची मशागत करत होते. पावसाच्या मेहेरबांनीवर आलेल्या पिकाच्या आपल्या परीने जोपासना करत होते. इंग्रज सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांकडे वळले. त्यांनी या शेतकऱ्यांचा शेतीवरील कर म्हणजेच शेतसारा वाढविण्याचा निणर्य घेतला. विनाकारण शेतसारा वाढवल्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड संताप निर्माण झाला. एवढा शेतसारा भरणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते शेतसारा कमी करावा म्हणून त्यांनी इंग्रज सरकारला विनंती केली, पण सरकार काही तयार होईना, वल्लभभाईंना हे समजले ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. शेतकऱ्यांची संघटना तयार करून त्यांनी सरकारला शह दिला.


कोणत्याही परिस्थितीत शेतसारा भरणार नाही असे शेतकऱ्यांनी ठरवले. इंग्रजांच्या हा जुलूम अमान्य करत वल्लभभाईंनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सत्याग्रह पुकारला. इंग्रजांनी शेतकऱ्यांचा छळ सुरू केला. त्यांच्या घरादाराचा, गुराढोराचा लिलाव पुकारला पण हा लिलाव घ्यायला कुणीच पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी सरकारी यंत्रणेवर पूर्ण बहिष्कार टाकला. सरकार हैराण झाले. सर्व शेतकरी एकत्र येऊन एका आवाजात इंग्रजांना ठणकावून सांगत होते “नही देंगे, नहीं देंगे." बार्डोलीच्या या सत्याग्रहाला राष्ट्रीय स्वरूप आले. सर्वच भागातील शेतकरी खडबडून जागे झाले. सर्वांनी या सत्यागृहाला पाठिंबा दिला. १२ जनू १९२८ हा दिवस "बोर्डाली" दिन म्हणून पाळला. काहीही झाले तरी शेतकरी नमणार नाहीत याची खात्री इंग्रजांना पटली. वल्लभभाईच्या या खंबीर कामगिरीपुढे सरकारला झुकावे लागले. त्यांनी आपला हुकूम मागे घेतला. शेतकऱ्यांचा विजय झाला. वर्लभाईंचा जयजयकार झाला.


निर्भिडपणे सरकारला तोड देत आपली भूमिका तसूभरही न बदलणारे वल्लभभाईचे नेतृत्व पाहूनच त्यांना "'लोहपुरुष" ही पदवी प्रदान केली. आताच्या सरकारने में दिलेल्या पदव्यांपेक्षा/पुरस्कारांपेक्षा जनतेचे मनापासून प्रेमपूर्वक दिलेल्या या पदव्या खरंच कितीतरी लक्षमोलाच्या,..


जसे 'लोकमान्य' राष्ट्रपिता या पदव्याही अशाच पद्धतीने जनतेने आपल्या लाडक्या नेत्यांना बहाल केल्या. वल्लभभाई पटेल यांनाही लोक प्रेमाने, आदराने सरदार' म्हणू लागले. वल्लभभाईंनी देशासाठी अनेकवेळा कारावास भोगला. १९३१ साली कराची येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्ष होते. अनेक सत्याग्रह करत, चळवळीची कामे करत, भारतभूमीला पारतंत्र्याच्या बेडीतून सोडविण्यासाठी अनेक मार्गांनी इंग्रजांना नेस्तनाबूत करण्याचे धाडस या 'लोहपुरुषाने' दाखविले., अपार कष्टानंतर, अनेकांचे बलिदान झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सार्वभौम भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून वल्लभभाई पटेल यांची निवड झाली. त्यावेळी देशात अनेक संस्थाने होती. ब्रिटीशांनी जाता जाता त्या संस्थांनांना सार्वभौम अधिकार दिले होते त्यामुळे ती संस्थाने स्वतःला स्वतंत्र समजत होती भारतीय संघराज्यात ती समाविष्ट होण्यास नकार देत होती. ही संस्थाने स्वतंत्र राहिल्यास देशात पुन्हा हुकूमशाही माजण्याची दाट शक्यता होती आणि म्हणूनच वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानिकांना बळाच्या माध्यमाने वठणीवर आणले. भारतीय संघराज्यात विलिनीकरणाने भारत हा एक अखंड देश बनला. भारत खऱ्या अर्थाने सार्वभौम झाला, याचे श्रेय वल्लभभाईंनाच जाते. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देऊन भारताचे हे लोहपुरुष १५ डिसेंबर १९५० रोजी अनंतात विलीन झाले.


Post a Comment (0)
Previous Post Next Post