वंदना
बुध्दासवेच बा भीमा तुला वंदना ।
शाक्य कुला, आणि तुझ्या कुला वंदना ।।
माणूस येथला आणि माणूस तेथला
तू जोडला अशा तुझ्या-पुला वंदना ।।
जन्मभूमी मृदू तुझी विश्वात गाजली
तू जन्मलास त्या तुझ्या-भूला वंदना ।।
दृष्टी विशाल होऊनी सृष्टीच ही करी
रामजी आणि भिमाईच्या-मुला वंदना ।।
ज्या वेलीवरचे फूल मी वाहील भीमा तुला
वामन करील त्या निळ्या-फुला वंदना ।।